कौटुंबीक वादातून पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात तुफान हाणामारी

फायटरसह दगडांचा वापर; जखमी तिघांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु
कौटुंबीक वादातून पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात तुफान हाणामारी

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात दोन कुटुंबियांमध्ये कौटुंबिक वादातून हाणामारी झाली. यात तीन जण गंभीर जखमी झाला. यावेळी एलसीबीचे कर्मचारी व महिला दक्षता समितीच्या कर्मचार्‍यांनी मध्यस्थी केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी जिल्हा पोलिस ठाण्यात कळविण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी की, पैठण येथील गणेश गिरी याचा विवाह जामनेर तालुक्यातील वाकोद येथील बरखा गणेश गिरी या मुलीशी चार महिन्यापूर्वी झाला होता. दोन महिने सुखी संसार झाल्यानंतर दोघांमध्ये तणाव निर्माण झाला.

नवर्‍याने घर जावई व्हावे यावरून दोघांमध्ये वाद होऊ लागले. त्यामुळे मुलगी बरखा ही जामनेरला आई-वडिलांकडे निघून आली.याप्रकरणी महिला दक्षता समितीमध्ये तक्रार करण्यात आली होती.

शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दोन्ही कुटुंबातील परिवार एस पी कार्यालयाच्या ठिकाणी तारखेवर आले होते. त्यावेळी हेडकॉन्स्टेबल मनीषा पाटील, अभिलाषा मनोरे, एन पी सी संगीता पवार यांनी दोन्ही कुटुंबांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांना कौन्सिलिंग केले. त्यानंतर दोघ परिवार कार्यालयातून बाहेर पडले.

बाहेर पडताच दोघांमध्ये हाणामारी

दोन्ही परिवार कार्यालयातून बाहेर पडताच त्यांच्यामध्ये तुफान हाणामारी झाली. यात गणेश गिरी याने आपल्या खिशातून फायटर काढीत त्याने संतोषगिरी उत्तमगिरी गोसावी व मनोजगिरी बाजीरावगिरी गोसावी या दोघांच्या डोक्यात मारीत त्यांना जखमी केले. त्र शिवागिरी उखलडूगिरी गोसावी, चंदाबाई अरुण गोसावी, निर्मलाबाई शिवा गिरी, भगवानगिरी गोसावी, गजू गिरी शिवागिरी गोसावी यांनी बरखा गणेश गिरी, ललिता मनोज गोसावी यांना चापटा बुक्क्यांनी मारणार करीत जखमी केले. जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यलयात उपचार सुरु आहे.

पोलिसांनी केली मध्यस्थी

महिला दक्षता कार्यालयाच्या बाहेर हाणामारी होत असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी धाव घेत मध्यस्थी केली. त्यानंतर जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले. दरम्यान, घटनेची माहिती जिल्हा पोलिस ठाण्यात कळविण्यात आले होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com