खोटे नगरातील तरुणाच्या खूनप्रकरणी आणखी 2 संशयितांना अटक

दोघांना 15 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
खोटे नगरातील तरुणाच्या खूनप्रकरणी आणखी 2 संशयितांना अटक
crime news

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

तालुका पोलिस ठाण्यासमोर पाण्याच्या टाकीजवळ जुुन्या वादातून महेश वासूदेव पाटील (वय-22) रा. हिराशिवा कॉलनी याचा चाकुने भोसकुन झाल्याची घटना 10 जुलै रोजी रात्री दहा वाजता घडली होती.

crime news
गुन्हेगारीतील वर्चस्वाच्या वादातून तरूणाचा खून

या गुन्हयात तालुका पोलिसांनी इश्वर अशोक पाटील रा. पिंप्राळा, मयुर नरेंद्र पाटील रा. हिराशिवा कॉलनी या दोन संशयितांना काल रात्री अटक केली. दोघांना जिल्हा न्यायालयाने दोघांना 15 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मयत महेशचे वडील वासूदेव मुरलीधर पाटील यांच्या फिर्यादीवरून बापु संतोष राजपूत, मयुर नरेंद्र पाटील, गजेंद्र उर्फ गोलू युवराज सुर्यवंशी सर्व रा. हिराशिवा कॉलनी आणि इश्वर अशोक पाटील रा. पिंप्राळा याचौघांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

यातील गजेंद्र उर्फ गोलु युवराज सुर्यवंशी याला तालुका पोलीसांनी अटक केली होती. त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या गुन्ह्यात ईश्वर पाटील व मयुर पाटील या दोघांना तालुका पोलिसांनी रविवार 11 जुलै रोजी रात्री अटक केली. दोघांना सोमवार, 12 जुलै जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना 15 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रविकांत सोनवणे हे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com