नगरसेविकेच्या बनावट शिक्क्याचा वापर करुन आधारकार्डमध्ये दुरुस्ती

संजय गांधी निराधार योजना कार्यालयातील प्रकार; गुन्हा दाखल होवून तीन जण ताब्यात
नगरसेविकेच्या बनावट शिक्क्याचा वापर करुन आधारकार्डमध्ये दुरुस्ती

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरातील तांबापुरातील नगरसेविका शबानाबी सादीक खाटीक यांच्या नावाच्या बनावट शिक्क्याचा वापर करुन रेल्वे स्टेशन परिसरातील संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयातील आधार केंद्रावर आधारकार्ड दुरुस्ती करण्यात येत असल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे.

याप्रकरणी इरफान जहिर शेख (रा.मलीक नगर), अमर भालचंद्र येवले (रा.खोटे नगर) व पियुष विनोद नवाल (रा.कुसुंबा, ता.जळगाव) या तिघांविरोधात नगरसेविका पूत्रांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून तिघांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे स्टेशन परिसरातील संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयातील आधार केंद्रावर आधारकार्ड दुरुस्तीसाठी नगरसेविका शबानाबी सादीक खाटीक यांच्या नावाच्या शिक्क्याचा वापर होत असल्याचे नईम बशीर खाटीक (रा.तांबापुरा) यांच्या निदर्शनास आले.

त्यांनी हा प्रकार 3 जून रोजी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या कार्यालयात असताना नगरसेविका पूत्र सलमान सादीक खाटीक यांच्या कानावर घातला. त्यावर सलमान यांनी घरी नगरसेविका असलेल्या आईला शिक्क्याबाबत विचारणा केली असता आपण कोणालाच शिक्का दिलेला नसल्याचे सांगितले.

पोलिसांनी पियुुष नवाल यालाही सायंकाळी ताब्यात घेतले. सलमान सादीक खाटीक यांच्या फिर्यादीवरुन तिघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com