दरोडा टाकरणार्‍या चौघांना ठोकल्या बेड्या

उपचारासाठी जाताच गवसले दरोडेखोर; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी
दरोडा टाकरणार्‍या चौघांना ठोकल्या बेड्या

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

दरोडा टाकत असतांना हाताने ट्रकचे लाईट फोडल्याने हाताला दुखापत झाली. उपचारासाठी डॉक्टरांकडे जाताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दरोडेखोेरांचा सुगावा लागता, आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या चोवीस तासातच चार दरोडेखोरांना अटक करण्यात आली.

चाळीसगाव तालुक्यातील दहिवद येथील दशरथ बबन बागुल हे 30 जून रोजी वाहन चालक असून ते एमएच 10 एडबल्यू 7336 क्रमांकाच्या ट्रकने पेपरची जूनी रद्दी घेवून भडगाव पाचोरा मार्गे आकोला येथे घेवून जात होते.

शेंदुर्णी ते पहूर रोडवरील गोंदेगावाजवळ पहूरकडे येत असतांना पाच ते सहा युवकांनी ट्रकसमोर दुचाकी लावून वाहन थांबविले. यातच एकाने दुचाकीवरुन खाली उतरून हाताने ट्रकचे हडलाईट फोडीत चालकाच्या खिशातून 8 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास करीत फिर्यादीसह क्लिनरला मारहाण करीत दरोडा टाकला होता. या प्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

उपचारासाठी येताच लागला सुगावा

दरोडेखोराने आपल्या हाताने ट्रकचे लाईट फोडल्याने त्याच्या हाताला दुखापत झाली होती. त्यामुळे तो दरोडा टाकल्यानंतर दवाखान्यात जाणार असल्याचे पोलीसांना समजले.

त्यामुळे त्यांनी घटनास्थळाजवळील सुमारे दहा किमी परिसरातील डॉक्टरांशी संपर्क साधून हाताला दुखापत झालेला पेशंट आल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. दरम्यान दरोडेखोर शेंदुर्णी येथील एका डॉक्टराकडे गेला असता त्याठिकणाहून पोलिसांना चोरट्यांचा सुगावा लागला.

सीसीटीव्हीत कैद होताच पडल्या बेड्या

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ज्याठिकाणी दरोडेखोर उपचारासाठी आला. त्या दवाखान्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यात दरोडा टाकणारे संशयीत आरोपी शुभम प्रकाश बारी (वय 20) रा. वाडी दरवाजा शेंदुर्णी, रोशन दत्तात्रय बडगुजर (वय 19) रा. सोयगाव रोड पाण्याच्या टाकीजवळ, गोरख बापू पाटील (वय 19) रा. वाडी दरवाजा, अक्षय प्रकाश पाटील (वय 20) रा. संजयदादा नगर शेंदुर्णी या चौघे त्यात दिसून आले.

पथकाने या चौघांच्या मुसक्या आवळून चौकशी केली असता, त्यांनी दरोडा टाकलयाची कबुली देत गुन्ह्यात वापरलेली दुचाकी देखील काढून दिली.

24 तासात आवळल्या मुसक्या

गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी दरोडेखोरांना अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार अशोक महाजन, शरीफ काझी, युनूस शेख, किशोर राठोड, विनोद पाटील, रणजीत जाधव, इद्रीस पठाण यांच्या पथकाने अवघ्या 24 तासाता संशयीत आरोपींना अटक केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com