पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने पेटवून घेतले

70 टक्के भाजल्याने विवाहिता गंभीर : मेहरुण येथील घटना
पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने पेटवून घेतले

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

पतीला दारुचे व्यसन व त्यात पतीकडून होणारा शारिरीक व मानसिक छळ याला कंटाळून झाल्याने उज्वला संजय पाटील (लाडवंजारी) वय 45 रा संतज्ञानेश्वर चौक, मेहरूण या महिलेने रॉकेल ओतून स्वतःला जाळून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना आज गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. घटनेत उज्वला पाटील ह्या 70 टक्के भाजल्या असून त्यांना पुढील उपचारासाठी गोदावरी मेडिकल कॉलेज येथे पाठविण्यात आले आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की. उज्वला पाटील (लाडवंजारी) या दोन मुले व पतीसह मेहरुण परिसरातील संत ज्ञानेश्वर नगर येथे वास्तव्यास आहे. त्यांचे पती संजय पाटील यांना दारुचे व्यसन आहे. पती हे दारु पिऊन उज्वला हिचा शारिरीक व मानसिक छळ करत होते. याला कंटाळून उज्ज्वला यांनी आज गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अंगावर रॉकेल ओतून घेत जाळून घेतले.

प्रकार लक्षात आल्यानंतर नगरसेवक प्रशांत नाईक व कार्यकर्त्यांनी उज्वला हिस जिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनेत उज्ज्वला या 70 टक्के भाजल्या आहेत. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कळस्कर यांनी उज्ज्वला हिस प्राथमिक उपचार करुन डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात हलविण्यातचा सल्ला दिला.

त्यानुसार तिला डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबत जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरु होते. दरम्यान उज्वला पाटील यांचा मोठा मुलगा अक्षय संजय पाटील (लाडवंजारी) याने दोन वर्षांपूर्वी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com