शेतकर्‍यास गंडविणार्‍या आणखी एक संशयित दिल्लीतून ताब्यात

शेतकर्‍यास गंडविणार्‍या आणखी एक संशयित दिल्लीतून ताब्यात

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

म्युचअल फंडच्या माध्यमातून पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकर्याला पावणे दोन कोटी रुपयांचा ऑनलाईन गंडा घालणार्या विकास सुरींदर कपूर (रा.दिल्ली) याचा साथीदार सचिन राम गुप्ता (दिल्ली) याला जळगाव सायबर पोलिसांनी आज सोमवारी दिल्लीतून ताब्यात घेतले.

दरम्यान अटकेतील विकास कपूर याच्या दिल्ली येथील घराची पथकाने झडती घेतली असून घरझडतीत गुन्ह्यात वापरलेले दोन लॅपटॉप, हार्डडिस्क जप्त करण्यात आले आहे.

एसबीआय लाईफ इन्श्युरन्स पॉलीसीला एजंट कोड आणि म्युच्युअल फंडच्या माध्यमातून पैसे डबल करुन देण्याच्या आमिषाने मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील वामन काशिराम महाजन या केळी उत्पादक शेतकर्याची तब्बल 1 कोटी, 73 लाख 89 हजार 945 रुपयांत फसवणूक केल्याची घटना 2014 ते 2019 दरम्यान घडली होती.

याप्रकरणी 7 मार्च 2020 रोजी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. या गुुन्हयात सायबर पोलिसांनी तब्बल तीन दिवस दिल्लीत तळ ठोकून 16 जून रोजी फसवणूक करणार्या विकास कपूर सुरिंदर कपूर यास सायबर पोलिसांनी अटक केली आहे.

त्याला 25 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बळीराम हिरे व उपनिरीक्षक संदीप पाटील यांचे दोन पथक दिल्लीत दाखल झाले आहेत.

आज सोमवारी पथकाने विकास कपूर याचा साथीदार सचिन राम गुप्ता यास दिल्लीतून ताब्यात घेतले आहे. इतर संशयितांचाही पथकाडून शोध सुरु आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com