एमआयडीसी पोलिसांकडून संशयितांचे अटकसत्र

एमआयडीसी पोलिसांकडून संशयितांचे अटकसत्र

जबरीचोरीसह विविध गुन्हयांमधील संशयितांच्या आवळल्या मुसक्या

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरातील एमआयडीसी पोलिसांनी आज सोमवारी जबरी चोरीसह दाखल विविध गुन्ह्यांमधील चार संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

संशयितांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता जबरी चोरीच्या गुन्ह्यातील दोन संशयितांना दोन दिवसांची पोलीस कोठडी तर कंपनीतून साहित्या लांबविणार्‍या एका दिवसाची व सराईत गुन्हेगाराची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान एमआयडीसी पोलिसांच्या अटकसत्रच्या मोहिममुळे खळबळ उडाली आहे.

कामगारास चाकूचा धाक दाखवून सात हजारांत लुटले

मूळ मध्यप्रदेशातील रहिवासी संजय नेहरु शिसोदीया वय 23 हे जळगाव शहरातील एमआयडीसीतील एन सेक्टर येथे कामाला असून त्याच ठिकाणी राहतात. 19 जून रोजी सकाळी 11 वाजता शिसोदीया कंपनीतून बाहेर पडले.

बसस्थानकावर एम.एच.19 सी.डब्लू 1676 या क्रमाकांच्या रिक्षातून जात असतांना बाजार समितीजवळ रिक्षाचालकाने शिसोदीया यांना चाकूचा धाक दाखवित मारहाण करत, त्यांच्या खिशातील 7 हजारांत लुटले होते.

याप्रकरणी काल रविवारी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यावर सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, मुकेश पाटील, इमरान सैय्यद, चेतन सोनवणे, मुदस्सर काझी यांच्या पथकाने रिक्षाचालक शाहरुख युसूफ पटेल वय 24 रा. सुप्रिम कॉलनी यास अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यात रिक्षाही जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक विशाल सोनवणे, संदीप पाटील हे करीत आहेत.

ठेकेदाराला लुटल्याप्रकरणी संशयितास अटक

जळगाव-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे ठेकेदार सुधीर व्यंकट रविपती (वय-40,रा.नेरी जामनेर) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन 4 एप्रिल रोजी एमआयडीसी पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली. गुन्हा दाखल झाल्यावर निवृत्ती ऊर्फ भगवान शांताराम बाविस्कर (वय-32,), राहुल रामदास कोळी (वय-22. देान्ही रा..मेस्को माता नगर) यांना 5 एप्रिल रोजी रोजी अटक करण्यात आली होती.

या दोघांचा साथीदार आकाश अशोक गायकवाड हा मुद्देमालासह पंजाब राज्यात पसार झाला होता. संशयित आकाश गायकवाड हा जळगावात आल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावर त्यास आज सोमवारी सहाय्यक फौजदार अतूल वंजारी, आनंदसिंग पाटील किशोर पाटील, मुकेश पाटील, चेतन सेानवणे, आसीम तडवी, योगेश बारी, सचिन पाटील यांच्या पथकाने अटक केली. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक अमोल मोरे करत आहेत.

कंपनीतून तांब्याच्या पट्ट्यांची चोरी करणार्‍यास अटक

एमआयडीसीतील सेक्टर सी मधील स्पेक्ट्रम इलेक्ट्रिक इंडस्ट्रिज कंपनीत ईलेक्ट्रिक वायर बनते. या कंपनीतून 2 लाख 40 हजार रूपये किंमतीचे तांब्याच्या पट्ट्या आणि 12 हजार रूपये किंमतीचे पितळी कॉईल असा एकुण 2 लाख 52 हजार रूपये किंमतीचा माल चोरीस गेल्याची घटना घडली होती.

याप्रकरणी सुरक्षा रक्षकाच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात सुपरवायझर जीवन चौधरी, हितेश कोल्हे आणि रिक्षा चालक दिपक यशवंत चौधरी या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यात रिक्षा चालक दिपक यशवंत चौधरी वय 38 रा. सदाशिव नगर, यास पोलीसांनी अटक केली असून त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

चोरीस गेलेल्या साड्यासह सराईत गुन्हेगाराला अटक

जीवनमोती कॉलनीतील वृंदा गरुड ह्या चार मे ते तीन जून पर्यंत बाहेरगावी गेलेल्या होत्या. या दरम्यान, त्यांचे बंद घर फोडून बावरी व त्याच्या एका अल्पवयीन साथीदारोन गरुड यांच्या घरातून 25 हजार 300 रुपये किमतीच्या दहा साड्या चोरल्या होत्या. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी बावरी याला अटक केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच चोरी केलेल्या साड्या पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. सन 2012 पासून नऊ वर्षात बावरी याच्यावर एकुण 19 गंभीर गुन्हे दाखल आहेत.

एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हिस्ट्रीशिटर्सच्या यादीत तो अग्रस्थानावर आहे. बावरी याला हद्दपारही करण्यात आले आहे. दरम्यान, त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com