चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक

चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक

शनिपेठ पोलिसांची कारवाई ; तीन दुचाकी हस्तगत

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरातील जैनाबाद भागात चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी आलेल्या सुनिल सखाराम तायडे वय 22 रा. भालशिव ता. यावल व विशाल रवींद्र बारी वय 23 रा. बारी वाडा, यावल , या दोघांना शनिपेठ पोलिसांनी आज गुरुवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास अटक केली आहे.

त्याच्याकडून तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. एका दुचाकीबाबत सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याने दोघांना पुढील कारवाईसाठी सावदा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

दुचाकी चोरीच्या पार्श्वभूमिवर पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांनी शनिपेठ पोलिसांचे स्वतंत्र पथक नियुक्त केले असून त्यांना कारवाईच्या सुचना केल्या आहेत.

आज गुरुवारी जैनाबाद परिसरात एक तरुण चोरीच्या दोन दुचाकी विक्रीसाठी आला असल्याची गोपनीय माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विठ्ठल ससे यांना मिळाली.

त्यानुसार त्यांनी पोलीस उपनिरीक्षक अमोल कवळे, गुन्हे शोध पथकातील गणेश गव्हाळे, रवींद्र पाटील , अमित बाविस्कर ,अमोल विसपुते ,राहुल पाटील ,अनिल कांबळे, मुकुंद गंगावणे ,राहुल घेटे याच्या पथकाला कारवाईच्या सुचना केल्या.

पथकाने जैनाबादमधून दोन दुचाकींसह सुनील सखाराम तायडे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने त्याच्या साथीदाराचेही नाव सांगितले.

त्यानुसार पथकाने विशाल रविंद्र बारी यालाही यावल शहरातील बारीपाडा येथून ताब्यात घेतले. दोघांकडून एकूण तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

दोघांनी एक दुचाकी सावदा येथून चोरल्याची कबूली दिली आहे. संबंधित दुचाकीबाबत सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याने संशयित सुनील तायडे व विशाल बारी या दोघांना पुढील कारवाईसाठी सावदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. शनिपेठ पोलिसांच्या सतर्कतेेमुळे दुचाकी चोरट्यांना अटक झाली असून त्याच्याकडून अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com