लाचखोर जिल्हा प्रकल्प अधिकार्‍यास कोठडी

लाचखोर जिल्हा प्रकल्प अधिकार्‍यास कोठडी

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

सुशिक्षीत बेराजगार असलेल्या तक्रारादाराकडून कर्ज आणि सबसिडी योजनेचा लाभ मिळवून देण्याकामी 10 हजाराची लाच घेणार्‍या जिल्हा उद्योग केंद्राच्या प्रकल्प अधिकारी आनंद देविदास विद्यागर (वय-50) रा. अजय कॉलनी रिंगरोड यांना काल मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.

त्याला आज जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान विभागाकडून संशयित अधिकारी राहत असलेल्या जळगाव शहरातील घराची तसेच त्याच्या बँक खात्याचीही झडती घेण्यात आली आहे

भुसावळ शहरातील 35 वर्षीय तक्रारदार हे सुशिक्षित बेरोजगार आहे. त्यांनी पीएमईजीपी या शासनाच्या योजनेंतर्गत कर्ज आणि सबसिडी योजनेचा लाभ मिळण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रात प्रस्ताव सादर केला होता.

हे प्रकरण बँकेला पाठविवून योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या मोबदल्यात प्रकल्प अधिकारी आनंद देविदास विद्यासागर याने 10 हजार रूपये मागितले होते. याबाबत तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती.

तक्रारीनुसार काल मंगळवारी पथकाने जिल्हा उद्योग केंद्राच्या आवारात 10 हजार रूपयांची लाच स्विकारतांना पथकाने आनंद विद्यासागर यास रंगेहात पकडले. पुढील तपास पोलीस निरिक्षक संजोग बच्छाव करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com