पोलिसात तक्रार दिल्याने तरुणावर चाकूने वार

एमआयडीसी पोलिसांकडून नऊ संशयित ताब्यात
पोलिसात तक्रार दिल्याने तरुणावर चाकूने वार

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

मारहाण करणार्‍यांविरोधात पोलिसात तक्रार देवून घराकडे परतत असतांना मारहाण करणार्‍यांनीच पुन्हा पोलिसात तक्रार का दिली या कारणावरुन रिहान खान फिरोज खान वय 24 या तरुणावर दहा जणांच्या टोळक्याने हल्ला चढविल्याची घटना मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास मासुमवाडी येथे घडली.

मारहाणीदरम्यानर तरुणावर चाकूने वार करुन त्याला गंभीर दुखापत केली असून त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने पोलिसांचा धाक संपला की काय असा सवाल उपस्थित होत आहे.

याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर रात्रभरातच अटकसत्र मोहिम राबवून एमआयडीसी पोलिसांनी 9 संशयितांना अटक केली आहे.

मासुमवाडी येथे रिहान खान फिरोज खान वय-24 हा वडील फिरोज खान, आई शमा बी, भाऊ शाहरुख खान अशांसह राहत असुन मजुरी करुन परीवाराचा उदरनिर्वाह चालवतो. 10 जून रोजी रात्री 10 वाजता रिहान हा घरी जात असतांना जुन्या भांडणाच्या कारणावरुन अविनाश रामेश्वर राठोड व गण्या पूर्ण नांव माहीती नाही दोघे रा.रामेश्वर कलनी ता.जि.जळगांव व दोन अनोळखी व्यक्ती अशांनी मारहान करुन शिवागाळ,धमकी दिली होती. याप्रकरणी रिहान याने संबंधितांविरोधात एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली आहे.

याप्रकरणी रिहान खान याने दिलेल्या फिर्यादीवरुन मारहाण करणार्‍या संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलीस हेडकॉन्स्टेबल गफ्फार तडवी, राजेंद्र कांडेलकर, महेंद्रसिंग पाटील, गोविंदा पाटील, चेतन सोनवणे, किशोर पाटील, हेमंत कळस्कर, चंद्रकांत पाटील याच्या पथकाने रात्रभर अटकसत्र मोहिम राबवून फारुख शेख अजीज वय 22 रा. तांबापुरा, सचिन कैलास चौधरी वय 21 रा ईश्वर कॉलनी, वाजीद खान हमीद खान वय 44, जुनेद सादीक शेख वय 22 दोन्ही रा. मासुमवाडी, निखिल मनोहर सोनार वय 22 , शुभम भगवान माळी वय 31 दोन्ही रा. सम्राट कॉलनी, आकाश अजय सोनार वय 21 लक्ष्मीनगर, अविनाश रामेश्वर राठोड रा. रामेश्वर कॉलनी, गणेश भास्कर सोनार रा. लक्ष्मी नगर या नऊ जणांना अटक करण्यात आली. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल महेंद्रसिंग पाटील हे करीत आहेत.

तक्रार देवून घरी परतांना पुन्हा हल्ला

पोलिसात तक्रार देवून रात्री 12 वाजता घरी जात असतांना रिहानला पुन्हा मासूमवाडी येथील डायमंड हॉलजवळ अविनाश राठोड यांच्यासह काही तरुणांनी अडविले. तु पोलीस स्टेशनला आमचे विरुध्द का तक्रार दिली, असे म्हणून रिहानला चापटा बुक्कांनी मारहान करण्यास सुरवात केली.

त्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता अविनाश रामेश्वर राठोड याने त्याचे हातातील चाकुने रिहानच्या कमरेवर वार केले. यात दुखापत तसेच रक्तस्त्राव होवून रिहान खाली पडला. यानंतरही त्याला अविनाश सोबतच्या इतरांनी लाथा बुक्कांनी मारहान करुन शिवीगाळ केली.

तसेच आमचे विरुध्द तक्रार का दिली, तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली. कुणीतरी या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळ रवाना झाले. पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता संशयित पळून गेले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com