तब्बल 24 दुचाकी चोरणार्‍या संशयिताला एलसीबीकडून अटक

तब्बल 24 दुचाकी चोरणार्‍या संशयिताला एलसीबीकडून अटक

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

चोपडा तालुक्यातील सातपुडा जंगलात तब्बल दहा दिवस मुक्काम ठोकून स्थानिक गुन्हे शाखेने सराईत गुन्हेगार गणेश उर्फ गुंठ्या भल्या पावरा वय 20 रा. बोरमळी ता.चोपडा याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

त्याच्याकडून जळगाव शहरासह चोपडा तालुक्यातील चोरलेल्या 24 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. दरम्यान संशयित गणेश याला गेल्य काही वर्षापूर्व मध्यप्रदेश पोलिसांनी एका गुन्हयात चौकशाठी ताब्यात घेतले होते. त्यावेळी हाताच्या बेड्यासहीत मध्यप्रदेश पोलिसांच्या तावडीतून पसार झाला होता, अशी माहिती मिळाली आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी जिल्हाभरातील दुचाकी चोरीचे गुन्हे उघड करण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखेल्या दिल्या आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले कर्मचार्‍यांची पथके तयार करुन त्यांना ठिकठिकाणी रवाना केले होते.

चोपडा तालुक्यातील बोरमळी येथील गणेश उर्फ गुंठ्या पावर्‍या हा चोपडा व जळगावात दुचाकी चोरी करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार श्रीकृष्ण पटवर्धन, अशरफ शेख, सुनील दामोदरे, प्रदीप पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, दिपक शिंदे, मुरलीधर बारी या पथकाने संशयिताच्या शोधार्थ तब्बल दहा दिवस सातपुडा जंगलात मुक्काम केला.

याचदरम्यान संशयित गणेश पावर्‍या हा चोपडा शहरात एका ठिकाणी दारु पिऊन झोपला असल्याची माहिती मिळाल्यावर पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून एकूण 24 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

त्यापैकी जळगाव शहर पोलीस स्टेशनला चार, जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्यात एक तर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एक आणि चोपडा शहर व चोपडा तालुक्यातील अडावद पोलीस ठाणे असे एकूण 15 दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडून आणखी दुचाकी हस्तगत होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

संशयित गणेश हा दुचाकी चोरल्यानंतर अवघ्या 10 ते 15 हजारात तिची दुचाकीची विक्री करायचा. दरम्यान काही जणांना तो पैसे घेवून भाड्यानेही दुचाकी देत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार चोरीची दुचाकी खरेदी करणार्‍यांनाही चौकशीअंती गुन्हयात आरोपी करण्यात येणार आहे.गुन्हा उघडकीस करण्याकामी बोरमळी येथील बाबुराव बुटा पाडवी याचीही महत्वाची मदत पोलिसांना झाली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com