वडीलांच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या कुटुंबियांचे घर फोडून 65 हजारांचा ऐवज लंपास

जाखनीनगरातील घटना : 25 हजारांच्या रोकडसह दागिणे लांबविले
वडीलांच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या कुटुंबियांचे घर फोडून 65 हजारांचा ऐवज लंपास

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरातील कंजरवाडा परिसरातील जाखनी नगर येथे वडीलांच्या अंत्यविधी व दहाव्याच्या कार्यक्रमासाठी नाशिक येथे गेलेल्या कुटुंबियांचे घर फोडून चोरट्यांनी 25 हजाराची रोकड व दागिणे असा एकूण 65 हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना आज शनिवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जाखनीनगर येथे पायघन हॉस्पिटल समोर संदीप अशोक गारुंगे वय 40 हे कुटुंबांसह वास्तव्यास आहेत. 10 मे रोजी संदीप गारुंगे यांचे वडील अशोक रामचंद्र गारुंगे यांचे नाशिक येथे निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारासह उत्तरकार्य अशा कार्यक्रमासाठी जाखनीनगर येथील घर बंद करुन संदीप गारुंगे हे परिवारासह नाशिक येथे गेले होते.

आज शनिवारी सायंकाळी संदीप गारुंगे यांची आत्या बिंदीया नरेश रायचंद यांनी नाशिक येथून जळगावातील त्यांच्या मोलकरणीला फोन केला. तसेच संदीप गारुंगे यांच्या घराबाबत विचारले. मोलकरणीने घराचा किचनचा दरवाजा उघडा असल्याचे सांगितल्यावर, बिंदीया रायचंद यांनी संदीप गारुंगे यांची चुलत बहिणीस जाखनीनगरातील घरी जावून खात्री करण्यास सांगितले.

खात्री करण्यास गेलेल्या चुलत बहिणीला संदीप गारुंगे यांच्या घरात सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसला. तिने सर्व हकीकत नाशिक येथील बिंदीया रायचंद यांना कळविली. त्यानुसार संदीप गारुंगे यांच्यासह त्यांची आत्या व परिवारासह खाजगी वाहनाने जळगावात पोहचले.

घरात पाहणी केल्यावर चोरीची खात्री झाल्यावर संदीप गारुंगे यांनी रात्री 9 वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.

चोरट्याने गारुंगे यांच्या घरातून 25 हजार रुपये किंमतीचे 10 ग्रॅमची सोन्याची माळ, 7 हजारांची 5 ग्रॅमची सोन्याची अंगठी, 5 हजारांचे 3 ग्रॅम कानातले, 3 हजारांच्या 20 ग्रॅमच्या चांदीच्या पैजन दोन जोड्या व 25 हजार रुपये रोख असा एकूण 65 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविला असून एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस कर्मचार्‍यांसह घटनास्थळी श्वानपथक, तसेच ठसे तज्ञांनी भेट दिली होती. घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी साईनाथ मुंडे करीत आहे

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com