मालमत्तेच्या वादातूनच वहिनीचा खून

पिंप्राळा तलाठ्यासह सासरच्यांना अटकेची मागणी; दिराला पोलीस कोठडी
मालमत्तेच्या वादातूनच वहिनीचा खून

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरातील पिंप्राळा परिसरातील मालमत्तेच्या वादातून मयुर कॉलनी येथे दीपक लोटन सोनार (38) याने त्याची वहिनी योगिता मुकेश सोनार (वय 39, रा. मयूर कॉलनी, पिंप्राळा) यांचा डोक्यात कुर्‍हाडीने वार करत खून केल्याची घटना काल शुक्रवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली होती.

याप्रकरणी रात्री साडेबारा ते 1 वाजेच्या सुमारास मयत योगीता सोनार यांचा मुलगा आर्यन मुकेश सोनार वय 14 वर्ष याच्या फिर्यादीवरुन खून करणार्‍या दिपक सोनार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान अटक करण्यात आलेल्या संशयित दिपक सोनार यास आज शनिवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान आज सकाळी जिल्हा रुग्णालयात मयत योगीता यांच्या माहेरच्यांनी तिच्या सासरच्या मंडळींना अटक करण्याची मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने गोंधळ निर्माण झाला होता.

मुलाने दिली फिर्याद

मयुर कॉलनी येथे मयत योगिता सोनार या शहरातील मयूर कॉलनीत त्यांच्या सासू प्रमिला, दीर दीपक आणि मुलगा आर्यन यांच्यासह राहत होत्या. सहा महिन्यांपूर्वी त्यांचे पती मुकेश लोटन सोनार यांचे यावल येथे अपघाती निधन झाले होते. मुकेश यांच्या निधनानंतर 16 दिवसांनी त्यांचे वडील लोटन सोनार यांचेही हृदयविकाराने निधन झाले होते.

मुकेश सोनार यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी योगीता व मुकेश सोनार यांचा भाऊ दीपक सोनार यांच्यात प्रॉपर्टीवरुन अधुनमधून वाद होते होते.

शुक्रवारी सायंकाळी जेवण झाल्यानंतर दीपक हा घरात भावाच्या काही फाईल्स बघत होता. तेवढ्यात त्याचे व वहिनी योगीता यांच्यात वाद झाला. अन् संतापलेल्या दीपकने पलंगा मागील कुर्‍हाड काढून वहिनी योगिता यांच्या डोक्यात कुर्‍हाडीने घाव घातले. यात योगिता यांचा घराचा दारात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

यानंतर काकाच्या हातातील कुर्‍हाड हिसकावून योगीता यांचा मुलगा आर्यन याने फोनवरुन त्याचे मावशी प्रियंका, आत्या सुदर्शना व आजी यांना घटना कळविली.

यादरम्यान घरासमोर राहणार्‍या सुनील वडनेरे व त्यांचा मुलगा सोनू वडनेरे याने योगीता यांना दवाखान्यात दाखल केले. दिपक सोनार यांनी प्रापर्टीच्या वादातूनची आई योगीता हिचा खून केला. अशी फिर्यादी आर्यन सोनार याने दिली आहे.

संशयिताला पोलीस कोठडी

रात्री उशीरा रामानंदनगर पोलीस ठाण्यात दिपक सोनार यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. घटनेनंतर अवघ्या काही वेळातच रामानंदनगर पोलिसांनी दिपक यास अटक केली होती. तसेच कुर्‍हाड सुध्दा जप्त केली होती. आज शनिवारी संशयित दिपक सोनार यास गुन्ह्याचे तपासअधिकारी हेडकॉन्स्टेबल प्रवीण जगदाळे यांंनी जिल्हा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे

मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार

शुक्रवारी जिल्हा रुग्णालयात मयत योगीता यांच्या बहिणीसह माहेरच्या नातेवाईकांनी दिपक सोनार यांच्यासह योगीता यांचे सासू, नणंद, नंदोई, नंदोईचा मुलगा व पिंप्राळा तलाठी यांनाही अटक करावी अशी मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. योगीता हिचा अनेक दिवसांपासून छळ सुरु होता.

दिपक सोनार याच्याबरोबरच पिंप्राळा तलाठी हा सुध्दा मालमत्तेच्या वादाला कारणीभूत असून त्याच्यासह सर्वांना अटक झालीच पाहिजे. मयताचे दागिणेही तिच्या नणंदने चोरुन घेतले होते. तर संशयित दिपकनेही सर्वांना मारीन अशी धमकी दिल्याचेही सांगत सर्वांना अटक करुन शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी, मयताच्या बहिणीने केली. अखेर रामानंदनगर पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढली आणि नातेवाईकांनी शवविच्छेदन करत मृतदेह ताब्यात घेतला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com