कौटूंबिक वाद : दिराकडून वहिनीची कुऱ्हाडीने हत्या

पिंप्राळ्यातील मयूर कॉलनीतील घटना; दिरास अटक
कौटूंबिक वाद : दिराकडून वहिनीची कुऱ्हाडीने हत्या

जळगाव - Jalgaon :

कौटूंबिक वादातून दिराने आपल्या वहिनीच्या डोक्यात कुर्‍हाडीने वार करत तिची निर्घृणपणे हत्या केली. ही धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री ९ वाजता शहरातील पिंप्राळा परिसरातील मयूर कॉलनीत घडली.

योगिता मुकेश सोनार (वय ३९, रा. मयूर कॉलनी, पिंप्राळा) असे हत्या झालेल्या महिलेचे तर दीपक लोटन सोनार (३८) असे संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे.

काय आहे नेमकी घटना ?

मयत योगिता सोनार या शहरातील मयूर कॉलनीत त्यांच्या सासू प्रमिला, दीर दीपक आणि मुलगा आर्यन यांच्यासह राहत होत्या. सहा महिन्यांपूर्वी त्यांचे पती मुकेश लोटन सोनार यांचे यावल येथे अपघाती निधन झाले होते.

मुकेश यांच्या निधनानंतर १६ दिवसांनी त्यांचे वडील लोटन सोनार यांचेही हृदयविकाराने निधन झाले होते.

दरम्यान, त्यांच्यात कौटुंबीक कारणावरून सातत्याने वाद होत होते. शुक्रवारी जेवण झाल्यानंतर दीपक हा घरात भावाच्या काही फाईल्स बघत होता. तेवढ्यात त्याचे व वहिनीचा वाद झाला. अन् संतापलेल्या दीपकने पलंगा मागील कु-हाड काढून वहिनी योगिता यांच्या डोक्यात कुर्‍हाडीने घाव घातले. यात योगिता यांचा घराचा दारात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

रस्त्यावर कु-हाड घेवून फिरत होता मारेकरी...

वहिनीच्या डोक्यात कु-हाड मारल्यानंतर दीपक हा घराबाहरे आला. नंतर तो कु-हाड घेवून रस्यावर फिरत होता. ही घटना एलसीबीचे प्रितमसिंग पाटील व तुषार जोशी यांना कळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना दीपक हा कु-हाड घेवून फिरताना दिसून आला. त्यांनी कसे-बसे त्यास पकडले. व नंतर पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला.

दरवाजात रक्ताचा सडा...

कु-हाड मारल्यामुळे घराच्या मुख्य दरवाजाच्या ठिकाणी अक्षरश: रक्ताचा सडा पडलेला होता. तर काही अंतरावर कु-हाड पडून होती. घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अनिल बडगुजर यांनी घटनास्थळी येवून पाहणी केली. तसेच सोनार कुटूंबाची चौकशी करीत घटनेची माहिती जाणून दिली. नंतर अपर पोलीस अधीक्षक चद्रकांत गवळी यांनी देखील घटनास्थळी येवून पाहणी केली.

माझी आई जीवंत आहे ना...

मुलगा आर्यन याने डोळ्यासमोर आईवर कु-हाडीने झालेले वार झालेले पाहिले असल्यामुळे अपर पोलीस अधीक्षक यांनी त्यास घटनाक्रम जाणून घेण्यासाठी बोलविले. त्यावेळी भेदरलेल्या आर्यनने त्यांना संपूर्ण हकीकत सांगितली. यात आर्यनने आपल्या काकाने वाद झाल्यानंतर पलंगा मागून कु-हाड काढून आईच्या डोक्यात मारली. त्यानंतर मी पाच जणांचा खून करणार आहे, हा एक झाला असून मला पोलीस काही करू शकत नाही, असे बोलल्याचे त्याने पोलिसांना सांगितले व माझी आई जीवंत आहे न अशी भावनिक विचारणा त्यांनी पोलिसांना केली.

दीपकला पोलिसांनी केली अटक

पोलिसांनी वहिनीवर कु-हाडीने हल्ला करणा-या दीर दीपक याला अटक केली आहे. रात्री खुनाच्या घटनेनंतर मयुर कॉलनी परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झालेली होती. सुनेच्या खूनानंतर सासू प्रमिला ह्या सुन्न झाल्या होत्या. रात्री साडे वाजेच्या सुमारास पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत कु-हाड ताब्यात घेतली. फॉरेन्सिक लॅबचे पथक सुध्दा घटनास्थळी दाखल झाले होते.

खाजगी कंपनीत कामाला

मयत योगिता यांचे पती सोनारी काम करीत होते. तर दीपक हा बांभोरी येथील खाजगी कंपनीत नोकरीला आहे. तसेच मुलगा आर्यन हा आठवीत शिक्षण घेतो. दरम्यान, या खूनाप्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com