हळदीच्या कार्यक्रमात हवेत फायरिंग करतांना बंदुकीत अडकली गोळी

गेंदालाल मीलमधील तरुणाला शहर पोलिसांकडून अटक : गावठी कट्टा व 3 जिवंत काडतुस हस्तगत
हळदीच्या कार्यक्रमात हवेत फायरिंग करतांना बंदुकीत अडकली गोळी

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरातील बीग बाझार परिसरात गावठी कट्टा घेवून दशहत माजविणार्‍या युनूस सलीम पटेल उर्फ सद्दाम पटेल वय 30 रा. गेंदालाल मील यास आज गुरुवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास शहर पोलिसांनी अटक केली आहे.

त्याच्याकडून दहा हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा व 150 रुपयांचे तीन जीवंत पिस्टल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान काल बुधवारी रात्री लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात संशयित युनूस पटेल याने हवेत फायरिंगचा प्रयत्न केला होता. मात्र यावेळी बंदुकीत गोळी अकडल्याने त्याचा प्रयत्न फसला होता, अशीही माहिती मिळाली आहे.

हळदीच्या कार्यक्रमात हवेत फायरिंगचा प्रयत्न

पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुुंढे यांनी जळगाव शहरातील सर्व प्रभारी अधिकार्‍यांना अग्निशस्त्र बाळगणार्‍या गुन्हेगारांवर नजर ठेवून कारवाईचे आदेश दिले. या आदेशानुसार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक धनंजय येरुळे यांनीही गुन्हे शोध पथकातील कर्मचार्‍यांना अलर्ट राहण्याच्या सुचना दिल्या होत्या.

कामल बुधवारी रात्री शहरातील एका ठिकाणी लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात गेंदालाल मिल येथील युनूस सलीम पटेल हा हातात गावठी कट्टा घेवून नाचला. नाचत असतांना हवेत फायर करतांना गोळी अडकली होती.

अशी गोपनीय माहिती शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल अक्रम शेख व भास्कर ठाकरे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा तसेच पोलीस निरिक्षक धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित युनूस पटेल याचा शोध सुरु केला.

सापळा रचून आवळल्या मुसक्या

आज गुरुवारी दुपारी संशयित बिगबाजार परिसरात हातात गावठी कट्टा घेवून दशहत माजवित असल्याची माहिती गुन्हे शोध पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीस निरिक्षक धनंजय येरुळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल अक्रम शेख, भास्कर ठाकरे, विजय निकुंभ, उमेश भांडारकर, गणेश पाटील, किशोर निकुंभ, रतन गीते, प्रणेश ठाकूर या कर्मचार्‍यांनी बिग बाजार परिसरात सापळा रचनू दहशत माजविणार्‍या संशयित युनूस पटेल यास ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता गावठी कट्ट्यासह तीन जीवंत काडतुस त्याच्याकडे मिळून आले. याप्रकरणी पोलीस नाईक भास्कर ठाकरे यांच्या फिर्यादीवरुन संशयित युनूस पटेल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय निकुंभ, रतन गीते हे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com