चोरीच्या गुन्ह्यात तीन वर्षांपासून फरार संशयिताला अटक

चोरीच्या गुन्ह्यात तीन वर्षांपासून फरार संशयिताला अटक

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला चोरीच्या गुन्ह्यात दाखल व तीन वर्षांपासून फरार असलेला संशयित आरोपी प्रदिप दिलीप भिल्ल (वय-22, रा. पिंप्री अकराऊत मुक्ताईनगर) यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज बुधवारी दुपारी त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेत अटक केली आहे.

संशयित आरोपी प्रदिप भिल्ल हा घरी आला असून तो शेतीकाम करत असल्याची माहिती पो.नि. किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.

अटकेतील संशयित आरोपी प्रदिप भिल्ल याच्या विरुद्ध मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला चोरीचे गुन्हे दाखल आहे. सदर गुन्हा घडल्यापासून व दाखल झाल्यापासून तो गेल्या तीन वर्षांपासून फरार होता.

पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अशोक ओंकार महाजन,पोलिस नाईक दिपक शांताराम पाटील, नंदलाल दशरथ पाटील, प्रमोद अरुण लाडवंजारी, पो.कॉ. भगवान तुकाराम पाटील, सचिन प्रकाश महाजन यांनी या कारवाईत करत त्याला राहत्या आज बुधवारी दुपारी गावातून अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी आरोपी प्रदिप भिल्ल यास पुढील तपासकामी मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com