चोरी करतांना चप्पल उमटली अन् त्यावरुनच चोरट्याला अटक

एमआयडीसी पोलिसांची कारवाई : कंपनीतून लांबविला होता २० हजारांचा ऐवज
चोरी करतांना चप्पल उमटली अन् त्यावरुनच चोरट्याला अटक

जळगाव - Jalgaon :

गुन्हेगार हा गुन्हा करतांनाही काही तर पुरावा हा सोडून जातो. त्याच्यावरुन पोलीस संशयिताला अटक करत असतात.

अशाप्रकारे चोरी करतांना घटनास्थळी संशयिताच्या उमटलेल्या चपलेच्या ठशांवरुन एमआयडीसीतील व्ही. सेक्टरमधील महेश प्लॉस्टिक इंडस्ट्रीज या कंपनीत चोरी करणार्‍या संशयित अरविंद अरुण वाघोदे वय २२ रा. सुप्रिम कॉलनी यास एमआयडीसी पोलिसांनी आज बुधवारी अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी या संशयिताने एका कंपनीतून २० लाख ६८ हजार ४४० रुपयांची रोकड लांबविली होती.

एमआयडीसीतील व्ही. सेक्टर मधील महेश प्लास्टिक इंडस्ट्रीज या कंपनीतून आठ हजार रुपये किमतींचा टीव्ही, सात हजार रुपये किमतीचा सीसीटीव्ही कॅ मेर्‍याचा डीव्हीआर व इतर साहित्य असा २० हजाराचा मुद्देमाल चोरी झाल्याची घटना १३ मे रोजी उघडकीस आली होती.

याप्रकरणी कंपनी मालक तुषार दयाराम राणे (रा. गणेशवाडी) यांच्या फिर्यादीवरुन १७ मे रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com