आठ लाखांच्या मुद्देमालासह जुगार खेळणारे 15 जण ताब्यात

आठ लाखांच्या मुद्देमालासह जुगार खेळणारे 15 जण ताब्यात

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरातील एमआयडीसी परिसरातील रॉयल इनफिल्ड बुलेट शोरुमच्या मागीच बाजूस काल शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारार अपर पोलीस अधीक्षकांसह पथकाने छापा टाकला.

या कारवाईत पथकाने जुगाराच्या साहित्य मोबाईल, दुचाकी, चारचाकी व रोख रुपये असा एकूण आठ लाख 13 हजार 15 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 14 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

एमआयडीसी परिसरातील बुलेट शोरुमच्या मागील बाजूस जुगाराचा खेळ सुरु असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना मिळाली. त्यांनी सहाय्यक पोलीस निरिक्षक जयेश खलाणे, पोलीस नाईक विजय सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल अजय पाटील, पवन पालोदकर यांच्यासह आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकासह काल शुक्रवारी रात्री बुलेट शोरुमच्या मागे घरांमध्ये सुरु असलेल्या जुगारावर छापा टाकला.

या कारवाई विशाल घनशाम भांडारकर वय 30 रा. लक्ष्मीनगर, गणेश सुरेश घ्याल वय 32 रा. लक्ष्मीनगर, नितीन सोनवणे वय 34 रा. अयोध्यानगर, अमोल सोनार वय 32 रा. अयोध्यानगर, सुरेश सपकाळे वय 45 रा. गुरुदेव नगर, निलेश पवार वय 26 र. राका फर्निचर जवळ म्हाडा कॉलनी, भुषण जैन रा. गुरुकूल सोसा. काशिनाथ हॉटेलजवळ, जळगाव, राजेंद्र वानखेडे वय 45 रा. सागरपार्कजवळ, जळगाव, सुनील जैन वय 38 अयोध्यानगर, ओमप्रकाश ठाकरे वय 33 रा. अयोध्यानगर, दीपक जैन वय 34 रा. अयोध्यानगर, सतीश पाटील वय 29 रा. अयोध्यानगर, आकाश मंडवे वय 24 रा. अयोध्यानगर, जितेंद्र सुनील पाटील वय 25 धानवड ता.जळगाव, या 14 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

तसेच 21 हजार 650 रुपये रोख व 8 लाख 13 हजार 500 रुपये किमतीचे मोबाईल, दुचाकी व कार असा एकूण 8 लाख 35 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अजय पाटील यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com