सलग दुसर्‍यांदा महापालिकेचे गोडावून फोडतांना चोरटे रंगेहाथ सापडले

रहिवासी, एलसीबीच्या कर्मचार्‍याच्या सतर्कतेने दोन महिलांना अटक
सलग दुसर्‍यांदा महापालिकेचे गोडावून फोडतांना चोरटे रंगेहाथ सापडले
चोरी

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरातील विजय कॉलनीत अशोक बेकरी समोर असलेले महापालिकेचे गोडावून सलग दुसर्‍यांदा चोरट्यांनी 13 मे रोजी रात्र अडीच ते तीन वाजेच्या सुमारास फोडले.

चोरी करत असतांना प्रकार लक्षात आल्याने या गोडावून समोर वास्तव्यास असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेेचे कर्मचारी विजयसिंग पाटील यांनी सतर्कतेने घटनास्थळ गाठले. याठिकाणी इतर तरुण मुद्देमाल घेवून पसार झेेाले. मात्र तांबापुर्‍यातील दोन महिलांना विजयसिंग पाटील यांनी पाठलाग करुन पकडले. जिल्हापेठ पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयत हजर केल्यावर दोन्ही महिलांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गणेश कॉलनी जवळील विजय कॉलनी परिसरात जळगाव महापालिकेच्या मालकीचे गोडावून आहे. अतिक्रमण विभागाने केलेल्या कारवाईत जप्त केलेल्या वस्तू याठिकाणी ठेवले जाते. 8 मे रोजी मध्यरात्री हे बंद गोडावून फोडून गोडावून मध्ये ठेवलेले 6 हजार रूपये किंमतीचे इलेक्ट्रिक चॉक असलेले तांब्याचे तार चोरून नेले होते. याप्रकरणी महापालिकेचे कर्मचारी युवराज मेढे रा. दांडकर नगर यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

सतर्क रहिवाशांमुळे दोन महिला सापडल्या

8 मे रोजी गोडावून फोडल्यानंतर 13 मे रोजी रात्री अडीच ते तीन वाजेच्या सुमारास पुन्हा चोरट्यांनी हे या महापालिकेच्या गोडावूनला लक्ष केले. काही तरुण तसेच महिलांनी याठिकाणाहून मोठ्याप्रमाणावर मुद्देमाल चोरुन नेण्याचा प्रयत्नात असतांना, काही तरुण चोरी करत असल्याचा फोन याठिकाणी रहिवासी असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी विजयसिंग पाटील यांना आला.

त्यानुसर विजयसिंग पाटील यांनी दंडुका घेत घटनास्थळ गाठले. व दोन महिलांना पाठलाग करुन पकडले. इतर तरुण याठिकाणाहून स्टार्टर, तांब्याचा तार तसेच इतर इलेक्ट्रीक साहित्य असा 10 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल घेवून पसार झाले.

संबंधित प्रकाराबाबत विजयसिंग पाटील यांनी जिल्हापेठ पोलिसांना कळविले. त्यानुसार पोलीस निरिक्षक विलास शेंडे, कर्मचारी दिपक पाठक, रवींद्र तायडे यांनी घटनास्थळ गाठले. व दोन्ही महिलांना ताब्यात घेतले. याप्रकरणी 14 मे रोजी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. पसार झालेल्या इतर तिघा तरुणांचाही पोलिसांकडून शोध सुरु आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रविंद्र तायडे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com