लग्नाचे आमिष दाखवत स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणार्‍या तरूणीवर अत्याचार

सीआरपीएफ जवानावर शहर पोलीसात गुन्हा
लग्नाचे आमिष दाखवत स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणार्‍या तरूणीवर अत्याचार

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरातील लग्नाचे आमिष दाखवून स्पर्धा परिक्षेचा अभ्यासासाठी जळगावात आलेल्या 26 वर्षीय तरुणीवर सलग तीन वर्ष वेळावेळी सीआरपीएफ जवानाने अत्याचार केल्याची घटना आज उघडकीस आली आहे.

याप्रकरणी सीआरपीएफ जवान जितेंद्र करतार जाधव (रा.वसंतनगर, ता.पारोळा ह.मु.जळगाव) यांच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी व जितेंद्र जाधव दोघही जळगाव शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना त्यांच्यात ओळख झाली. ओळखीतून दोघांचे मैत्रीत रूपांतर होवून प्रेमसंबंध निर्माण झाले. प्रेमसंबध निर्माण झाल्याने दोघांच्या भेटी गाठी होण्यास सुरूवात झाली.

जितेंद्रने पीडीत तरूणीला लग्नाचे आमिष दाखवत 2018 ते मे 2021 या कालावधीत जळगाव, अमरावती, पुणे व गुजरात मधील नडियाद याठिकाणी हॉटेल व लॉजमध्ये नेऊन वेळोवेळी जितेंद्रने अत्याचार केला.

प्रत्येक वेळी लग्न करणार असे सांगत त्याने तरुणीला विश्वासात घेऊन शरीरसंबंध ठेवले. 2 मे रोजी लग्न करण्याच्या तयारीने जितेंद्र जळगावात आला.

यावेळी त्याने लग्नाला लागणारे काही साहित्य आणले होते म्हणून तो परत रेल्वे स्टेशनमध्ये घेऊन गेला व तेथे त्याने पुन्हा त्यानंतर मूळ गावी वसंत नगर येथे गेला. तिथून आल्यानंतर लग्नास नकार दिला. आपल्याला फसविण्यात आल्याची खात्री पटल्यानंतर पीडित तरुणीने शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली . त्यावरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com