जिल्ह्यातून मोटारसायकल लांबविणार्‍या दोघांना अटक

एमआयडीसी पोलिसांची कामगिरी; कर्मचार्‍याच्या चौकसपणामुळे घटना उघडकीस
जिल्ह्यातून मोटारसायकल लांबविणार्‍या दोघांना अटक

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरासह जिल्ह्यातून मोटारसायकल लांबविणार्‍या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी दुपारी अटक केली.

त्यांच्याकडून चोरी केलेल्या चार मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या. तसेच या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी मुकुंदा सुरवाडे हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. या तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरासह जिह्यातून मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांना हे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षकांनी सुचना दिल्या होत्या.

एमआयडीसी पोलिस ठाण्यातील कर्मचारी गणेश शिरसाळे यांना पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार मुकुंदा देविदास सुरवाडे रा. मेहरुण हा मोटारसायकलींची चोरी करुन त्या मोटारसायकली त्याने चिंचोली गावातील गोपाल राजेंद्र पाटील व विशाल मधुकर इखे यांच्यामार्फत विक्री केल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी याबाबतची माहिती तात्काळ पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना दिली.

त्यानुसार पोलीस निरीक्षकांनी लागलीच पथक तयार करुन ते चिंचोली गावात पाठविले. यापथकाने गोपाल पाटील व विशाल इखे या दोघ संशयित आरोपींना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली. या चौकशीत त्यांनी सुरवाडे यांच्याकडील चोरीच्या मोटारसायकली विक्री केल्याचे कबुली दिली.

गावातून हस्तगत केल्या चार मोटारसायकली

संशयितांनी मोटारसायकल विक्री केल्याची कबुली देताच पथकाने चिंचोली गावात विक्री केलेल्या चार मोटारसाकली पोलिसांनी हस्तगत केल्या. या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य संशयित आरोपी मुकूंदा सुरवाडे हा अद्याप फरार आहे.

या पथकाने केली कारवाई

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, सफौ अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, गफ्फार तडवी, मिलिंद सोनवणे, गणेश शिरसाळे, योगेश बारी, सचिन पाटील, हेमंत कळसकर, सिद्धेश्वर डापकर, चंद्रकांत पाटील, शांताराम पाटील यांच्या पथकाने केली.

पोलिसाच्या चौकसपणामुळे चोरटे अटकेत

बंदोबस्तासाठी जात असलेले पोलिस कर्मचारी गणेश शिरसाळे यांची नजर एमएच 19 बीएम 7281 क्रमांकाच्या चोरीच्या मोटारसायकलवर पडली. या क्रमांकाची पासिंग ही कर्मर्शियल असल्याने पोलीस कर्मचारी गणेश शिरसाळे यांना या मोटारसायकलीबाबत शंका आली.

त्यांनी या मोटारसायकलीबद्दल अधिम माहिती जाणून घेतली असता, गावात अजून काही चोरीच्या मोटारयाकली असल्याचे त्यांना समजले. पोलिस कर्मचार्‍याच्या चौकसपणामुळे चोरीच्या मोटारसायकल विक्री करणार्‍यांच्या मुसक्या आवळण्यात यश आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com