डमी ग्राहक पाठवून चोरीच्या दुचाकीसह चोरट्याला रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : दोन दुचाकी हस्तगत
डमी ग्राहक पाठवून चोरीच्या दुचाकीसह चोरट्याला रंगेहाथ पकडले

जळगाव - Jalgaon :

स्थानिक गुन्हे शाखेने डमी ग्राहक बनवून पाठवून आज शनिवारी दुचाकी चोरट्याला अटक केली आहे.

दिगंबर रवींद्र सोनवणे (२२,रा. भोकर, ता. जळगाव) असे या संशयितांचे नाव असून त्याच्याकडून दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

जळगाव तालुक्यातील भोकर येथील तरुण चोपडा तालुक्यात चोरीच्या दुचाकी विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पंकज शिंदे यांना मिळाली होती.

त्यावरुन पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रदीप पाटील, जयंत चौधरी, सुनील दामोदरे, विजय पाटील, अविनाश देवरे, दिपक शिंदे, पंकज शिंदे, व पोलीस मुख्यालयातील सुनील मोरे यांचे पथक तयार करुन संशयिताला अटक करण्याच्या सुचना केल्या.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित डिगंबर सोनवणे याच्याकडे दुचाकी खरेदीसाठी शनिवारी चोपडा तालुक्यातील गोरगावले येथे एक डमी ग्राहक पाठवून त्याला रंगेहाथ पकडले.

त्याची चौकशी केली असता त्याने चोपडा शहरातून दोन दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. त्यातील एक दुचाकी चोपडा तालुक्यातील वैजापुर येथे विक्री केली होती.

पथकाने तील ताब्यात घेतली आहे. दुचाकी चोरीप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाणयात गुन्हा दाखल असल्याने पुढील कारवाईसाठी संशयित सोनवणे याला चोपडा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com