काकांच्या घरी दरोडा टाकणार्‍या पुतण्यासह टोळीचा पर्दाफाश

स्थानिक गुन्हे शाखेकडून सहा जणांना अटक
काकांच्या घरी दरोडा टाकणार्‍या पुतण्यासह टोळीचा पर्दाफाश

जळगाव - Jalgaon :

शहरातील इच्छादेवी चौक परिसरातील स्वामी टॉवर येथे राहणार्‍या काकाच्या घरात १७ एप्रिल रोजी सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास दरोडा टाकणार्‍या पुतण्यासह टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे.

या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने संशयित पुतण्या सनी इंदरकुमार साहित्या वय २५ स्वामी टॉवर , ईच्छादेवी चौक, जळगाव, राकेश शिवाजी सोनवणे वय ३५ रा देवपूर, धुळे, उमेश सुरेश बारी वय २५ रा. चर्चच्या मागे, जळगाव, मयुर अशोक सोनार वय ३५ रा. जळगाव व नरेंद्र उर्फ योगेश अशोक सोनर वय ३४ रा. जामनेर यांना अटक केली असल्याची माहिती आज गुरुवारी सायंकाळी ६ वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली.

दरम्यान यातील मुख्य संशयित सनी साहित्या याने त्याच्यावर झालेल्या कर्जामुळे हा दरोडा टाकला होता. घरात ३० ते ३५ लाख रुपयांची रोकड मिळेल या अपेक्षेने हा दरोडा टाकला, मात्र संशयितांना घरात काहीच हाती न लागल्याने रिकामे हाते परतण्याची वेळ आली होती.

प्रकाश साहित्या यांच्या घरात १७ एप्रिल रोजी सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास पाच जण घुसले. तसेच पिस्तूल व चाकूचा धाक दाखवू घरातील सोने व पैसे द्या अशी मागणी केली.

संशयितांनी पैकी एकाने घरातील कपाटे उघडून त्यात तपासणी केली. मात्र कुठलीही रोकड अथवा दागिणे संशयितांना मिळून आले नाही यानंतर सर्व संशयित साहित्या यांच्या घराला बाहेरुन कडी लावून चारचाकीने पसार झाले होते.घरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात संशयित कैद झाले होते.

त्यावरुन पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कामाला लागले होेते.

प्रकाश साहित्या यांच्या पुतण्या सनी याने हा दरोडा घडवून असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार ताब्यात घेतले, खाकीचा हिसका दाखविला.

यानंतर त्याने त्याच्या इतर साथीदारांच्या नावे सांगत गुन्हा घडवून आणण्याची कबूली दिली.

माहितीनुसार पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांच्यासह सहाय्यक पोलीस निरिक्षक स्वप्निल नाईक, सहाय्यक फौजदार अशोक महाजन, विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, नरेंद्र वारुळे,विजय पाटील, प्रितम पाटील, नितीन बाविस्कर, जयंत चौधरी, प्रदीप पाटील, नंदलाल पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी , सुनील दामोदरे, संदीप सावळे, श्रीकृष्ण पटवर्धन , मुरलीधर बारी, दर्शन ढाकणे, भगवान पाटील यांच्या पथकाने एक एक करत संशयित उमेश बारी, मयुर सोनार, नरेंद्र सोनार या तिघांना अटक केली.

राकेश सोनवणे हा निसटला होता. त्यालाही आज धुळ्यातून सापळा रचून अटक करण्यात आली. या गुन्ह्यात संशयित राकेश सोनवणे याच्या मालकीची वापरलेली चारचाकीही जप्त करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com