आशादीप वस्तीगृहात महिला कर्मचार्‍याला शिवीगाळ करत मारहाण

आशादीप वस्तीगृहात महिला कर्मचार्‍याला शिवीगाळ करत मारहाण

जळगाव - Jalgaon :

रुममध्ये झोपायचे असून ते खोलीतून बाहेर निघ असे म्हटले असता, आशादीप वसतीगृहात रत्नमाला मुरलीधर सोनार या महिलेने तेथील महिला अश्लिल शिवीगाळ करत मारहाण केली.

तसेच चाकूने जीवे ठार मारल्याची धमकी दिल्याची घटना 3 मे रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास घडली.

गणेश कॉलनी येथील शासकीय आशादीप महिला वस्तीगृहातील कर्मचारी आशा रामदास अनफट ह्या झोपण्यासाठी आल्या.

यावेळी त्यांनी रत्नमाला सोनार या महिलेस जाण्याचे सांगितले. याचा राग आल्याने रत्नमाला सोनार हिने कर्मचारी अनफट यांना अश्लिल शिवीगाळ करत मारहाण केली.

तसेच चाकूने खुपसून मारुन टाकेन अशी धमकी दिली. याप्रकरणी मंगळवारी रात्री जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार मनोज पवार करीत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com