उत्तर महाराष्ट्रात धुमाकूळ घालणार्‍या सोनसाखळी चोरट्यांचा पर्दाफाश

उत्तर महाराष्ट्रात धुमाकूळ घालणार्‍या सोनसाखळी चोरट्यांचा पर्दाफाश

एलसीबीची कारवाई : भुसावळातील चोरट्यासह सराफाला अटक

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात धुमाकूळ घालणार्‍या सोनसाखळी चोरणार टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला असून सोनसाखळी चोरणार्‍या तौफिक हुसेन जाफर हुसेन (वय 18, रा. भुसावळ) याच्यासह चोरीचे सोने विकत घेणारा हरिश्चंद्र दत्तात्रय इखनकर (वय 25, रा. भुसावळ) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

अटकेतील तौफिक याने आणखी दोघांसह 14 ठिकाणी केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी आज मंगळवारी पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा सभागृहातील पत्रकार परिषदेत दिली.

भुसावळ शहरातील तौफिक हुसेन व त्याचे इतर दोन साथीदार हे भुसावळसह इतर जिल्ह्यांमध्ये सोनसाखळी चोरत असल्याची माहिती माहिती पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती.

त्यानुसार त्यांनी सहायक फौजदार अशोक महाजन, शरिफ काझी, युनुस शेख, किशोर राठोड, रणजीत जाधव, विनोद पाटील, सचिन महाजन, वसंत लिंगायत, इद्रीस पठाण, मुरलीधर बारी व अशोक पाटील यांचे पथक तयार करून त्यांना कारवाईच्या सुचना केल्या.

हे संशयित भुसावळ येथून दुचाकीने पाचोरा मार्गे मालेगावला जायचे त्या भागात लासलगाव, निफाड व सिन्नर येथे सोनसाखळी थांबवायचे व मालेगावात मुक्काम करीत होते. या पथकाने तीन वेळा लासलगाव मालेगाव सिन्नर येथे संशयितांचा शोध घेतला मात्र ते मिळून आले नाहीत.

उत्तर महाराष्ट्रात 14 ठिकाणी गुन्ह्यांची कबुली

मंगळवारी तौफिक हा भुसावळला आल्याची माहिती मिळताच पथकाने त्याच्या घरी छापा टाकला. तेथून त्याला ताब्यात घेतले.

चौकशीत तौफिक याने सोहेल अली युसुफ अली व अरबाज अली युसुफ अली (रा. भुसावळ) या दोघांची नावे सांगितली. चोरीचे सोने ज्या सराफाला विक्री केले. त्याचेही नाव सांगितले.

त्यानुसार लागलीच हरिश्चंद्र इखनकर या सराफालाही स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेण्यात आले. तर उर्वरित दोघेजण फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

दरम्यान या सर्व संशयितांनी या सर्व संशयितांनी भुसावळ शहरात 3, मालेगाव 2, लासलगाव 2, शिरपूर, नंदुरबार, चाळीसगाव प्रत्येकी 1, निफाड व सिन्नर प्रत्येकी 2 अशा 14 ठिकाणी सोनसाखळी लांबविल्याची कबुली दिली आहे.

त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्याची कारवाई सुरु असल्याचेही यावेळी पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com