आयुष्यभराची कमाई फसवणुकीत बुडाल्याच्या धास्तीने सेवानिवृत्त कृषि सहाय्यकाचा मृत्यू

पैसे दुप्पट करुन देण्याच्या आमिषाने 33 लाख 20 हजार 752 रुपयांचा गंडा

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

चार वर्षात पैसे दुप्पट करुन देण्याचे आमीष देत इन्शुरन्स कंपनीच्या नावाने रमेश देवरे (रा. खोटेनगर) या निवृत्त कृषी सहायकास 33 लाख 20 हजार 752 रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली होती.

याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आयुष्यभराची कमाई या प्रकारात आयुष्यभराची कमाई फसवणूक झाल्यामुळे पुन्हा परत मिळणार नाही, याची धास्ती घेवून सेवानिवृत्त कृषि सहाय्यकाचा 8 मार्च रोजी मृत्यू झाला.

रमेश देवरे हे ममुराबाद येथील कृषी संशोधन केंद्रात सहायक पदावरुन सेवानिवृत्त झाले आहेत. सन 2014 मध्ये देवरे यांना गौरव शर्मा व अग्रवाल या बनावट नाव वापरुन तरुणांनी आपण लाइफ प्लस इन्शुरन्स या कंपनीतून बोलत असल्याचे सांगून कंपनीच्या पॉलिसीत पैसे गुंतविल्यास चार वर्षात दुप्पट रक्कम मिळेल असे आमीष त्यांनी देवरेंना दिले.

या आमिषामुळे देवरे यांनी सुरूवातीला दोन लाख रुपये गुंतवले. त्यानुसार भामट्यांनी काही बनावट कागदपत्र पाठवुन त्यांचा विश्वास संपादन केला. यानंतर वेळावेळी विविध कारणे सांगून पैशांची मागणी केली.

पैशांच्या चिंतेत 8 मार्चला झाला मृत्यू

2014 ते फेब्रुवारी 2021 अशा सुमारे सहा वर्षात देवरे यांनी ऑनलाइनच्या माध्यमातून 33 लाख 20 हजार 752 रुपये पाठवले होते.

दरम्यान, सन 2013 मध्ये देवरे सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांना शासनाकडून मिळालेले पैसेही पाठवुन दिले.

पैसे भरल्यानंतर परत कधी मिळणार याची विचारणा त्यांनी वेळोवेळी केली होती. परंतु, भामट्यांनी उडवा-उडवीची उत्तरे देऊन वेळ मारुन नेली.

फेब्रुवारी 2021 मध्ये भामट्यांनी देवरे यांचा फोन घेणे देखील बंद केले होते. दरम्यान, आपली फसवणूक झाली असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर देवरे हे धास्तीत गेले. पैशांच्या चिंतेत असताना 8 मार्च 2021 रोजी त्यांचे निधन झाले.

फसवणुकीचे कळाल्यावर कुटुंबियांना बसला धक्का

यानंतर कुटुंबीयांनी देवरे यांच्या काही पॉलिसींची माहिती घेतली असता त्यांच्या खात्यातून वेळोवेळी करुन 33 लाख रुपये ऑनलाईन पाठवण्यात आल्याचे समोर आले.

देवरे यांनी तीन लाख रुपये गुंतवल्याची माहिती कुटुंबीयांना दिली होती. परंतु, यानंतर त्यांनी पुढील पैसे गुंतवताना कुणालाही काही सांगीतले नाही.

परिणामी कुटुंबीयांना देखील धक्का बसला. देवरे यांचा मुलगा सुनिल यांनी या संदर्भात संपुर्ण माहिती गोळा केली असता वडीलांना कुणीतरी फसवल्याचे त्यांच्या लक्षात आले.

सुनील देवरे यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गौरव शर्मा व अग्रवाल (बनावट नावे) यांच्या विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com