कांचननगरात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

आठ जणांविरुद्ध शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल
कांचननगरात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड
crime news

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरातील कांचन नगर भागातील प्रशांत चौकात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शनीपेठ पोलीसांनी छापा टाकला.

यात 6 हजार 280 रूपयांच्या रोकड हस्तगत करून आठ जणांवर शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील कांचन नगर भागात असलेल्या प्रशांत चौकात काही व्यक्ती बेकायदेशीर जुगार खेळत असल्याची माहिती शनीपेठ पोलीसांना मिळाली.

त्यानुसार 29 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास पोलीसांनी प्रशांत नगरातील जुगार अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली.

या कारवाईत विवेक उर्फ भैय्या मधुसुदन सपकाळे, गजानन वसंत चंदनकर, रोशन आप्पा उर्फ प्रभाकर पाटील, सागर भिवलाल कोळी, पंकज सुपडू मोहासे, नामदेव सुकदेव माळी, हितेश संजय निंबाळकर आणि जयेश शरद मराठे सर्व रा. प्रशांत चौक कांचननगर यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याजळून 6 हजार 280 रूपयांची रोकड आणि जुगार खेळण्याचे साहित्या हस्तगत केले आहे. पो.कॉ. राहूल पाटील यांच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पथकाने केली कारवाई

ही कारवाई पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि अमोल कावडे, पोहेकॉ रविंद्र पाटील, अनिल कांबळे, पो.ना. अमित बाविस्कर, पोकॉ राहूल पाटील यांनी कारवाई केली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com