जादा दराने रेमडेसीवीर विक्री करणार्‍या औषध विक्री प्रतिनिधीला अटक

जादा दराने रेमडेसीवीर विक्री करणार्‍या औषध विक्री प्रतिनिधीला अटक

जिल्हापेठ पोलिसांची सिंधी कॉलनीत कारवाई : एका दिवसाची पोलीस कोठडी

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरातील सिंधी कॉलनी येथे रेमडेसीवीर इंजेक्शनची चढ्या दराने विक्री करणार्‍या मुर्शरफ खान मसुर खान (वय-26) रा. मासुमवाडी औषध विक्री प्रतिनिधीला जिल्हापेठ पोलिसांनी बुधवारी दुपारी रंगेहाथ अटक केली आहे.

त्याच्याकडून इंजेक्शन जप्त करण्यात आले आहे. आज संशयितास न्यायालयात हजर केले असता, त्यास एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

गेल्या दोन दिवसांपुर्वी पोलीसांनी इंजेक्शनचा काळाबाजार करणार्‍या 12 जणांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान बुधवारी दुपारी शहरातील सिंधी कॉलनी परिसरात एक तरूण रेमडीसीवीर इंजेक्शन चढ्या भावाने विक्री करत असल्याची माहिती जिल्हा पेठ पोलीसांनी मिळाली.

त्यानुसार सहाय्यक पोलीस निरिक्षक महेंद्र वाघमार, पोलीस नाईक प्रशांत पाठक यांनी सापळा रचून संशयित मुर्शरफ खान मसुर खान (वय-26) रा. मासुमवाडी जळगाव याला अटक करून त्याच्या ताब्यातील 5 हजार 400 रूपये किंमची रेमडीसीवीर इंजेक्शन हस्तगत केले आहे.

याप्रकरणी प्रशांत पाठक यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान जिल्हापेठ पोलिसांनी संशयित मुर्शरफ खान यास अटक गुरुवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्या आले. न्यायालयाने संशयितास एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com