आई, वडिलांनी जेवण न देता खोलीत कोंडून ठेवल्याने ’त्या’ मुलीचा मृत्यू

आई, वडिलांनी जेवण न देता खोलीत कोंडून ठेवल्याने ’त्या’ मुलीचा मृत्यू

तहसीलदारांच्या उपस्थितीत शवविच्छेदन अन् पंचनामा : आई-वडिलांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Title Name
११ वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू अन् पित्याकडून गुपचूप दफनविधी
आई, वडिलांनी जेवण न देता खोलीत कोंडून ठेवल्याने ’त्या’ मुलीचा मृत्यू

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

पिंप्राळा हुडकोतील रझा कॉलनीत कनीज फातेमा जावीद अख्तर शेख (वय 11) या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर तिच्या वडीलांनी गुपचूप दफनविधी केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी समोर आला.

पोलिसांनी आज बुधवारी सकाळी 8 वाजता दफनविधी केलेला मुलीचा मृतदेह उकरुन काढत, त्याचे घटनास्थळावरच तहसीलदारांसमोर शवविच्छेदन करत पंचनामा केला.

दोन ते तीन दिवस मुलीला घरात कोंडून ठेवून जेवण न दिल्याने भुकबळीने तिला मृत्यू झाल्याचे प्राथमिक कारण शवविच्छेदनातून समोर आले आहे.

नेमके मृत्यूचे कारण समोर येण्यासाठी व्हिसेरा राखीव ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी फिर्यादी होवून मुलीच्या मृत्यूस कारणीभूत आई नाजीया परवीन जावेद अख्तर व वडील जावेद अख्तर शेख जमालोद्दीन या दोघांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. मुलीचे वडील जावेद शेख यांना अटक करण्यात आली असून आईला रिमांडहोममध्ये ठेवण्यात आले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कनीज हिचा 23 रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास संशयास्पद मृत्यू झाला. वडील जावेद शेख यांनी दुसर्‍या दिवशी म्हणजेच 24 एप्रिल रोजी तिचा दफनविधी केला.

ही घटना त्याने कोणालाच सांगितली नाही. नंतर घराला कुलूप लावून पत्नी व दोन्ही मुलींना घेऊन तो गायब झाला. त्यामुळे संशय बळावला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कनीजच्या मामांनी त्यांचा शोध घेतला, परंतु ते कुठेही मिळून आले नाही.

शेवटी कनिजचे मामा अजहर अली शौकत अली (रा.अमळनेर) सोमवारी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

त्याआधारावर पोलिसांनी जावेद शेख तसेच मुलीची आई या दोघांना अमळनेर येथून चौकशीसाठी ताब्यात घेतले. मुलीच्या आईला आशादीप वस्तीगृहात ठेवण्यात आले आहे. तर जावेद शेख याला अटक केली आहे.

तहसीलदारांच्या उपस्थितीत शवविच्छेदन अन् पंचनामा

आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा, रामानंदचे पोलीस निरिक्षक अनिल बडगुजर, सहाय्यक पोलीस निरिक्षक दिपक बिरारी यांच्यासह गोपनीयचे राकेश दुसाने, हर्षल पाटील तसेच जितेंद्र तावडे, अतुल चौधरी, रविंद्र पाटील, सुशील चौधरी रविंद्र चौधरी, चेतन अहिरे, हरिष डोईफोडे यांच्यासह मयत कनिजचे मामा, तसेच डॉक्टर व तहसीलदार या सर्वांनी पिंप्राळा हुडकोतील स्मशानभूमी गाठली. याठिकाणी दफन केलेले कनिजचा मृतदेह उकरुन बाहेर काढण्यात आला. नायब तहसीलदार प्रदीप राजपूत यांच्या उपस्थितीत कायदेशीर पध्दतीने दुपारी एक वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयाचे डॉ. वैभव सोनार यांनी शवविच्छेदन केले. पाच ते सहा तासानंतर 2 वाजेच्या सुमारास पुन्हा मृतदेहाचा दफनविधी करण्यात आला.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

रामानंदनगर पोलिस ठाण्याचे पोलीस सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक बिरारी यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत फेब्रुवारी 2019 पासून ते 23 एप्रिलपर्यंत कनीरला तिच्या आई-वडीलांनी वेळोवेळी मारहाण शिवीगाळ केली आहे. तसेच तिला एका खोलीत कोंडून जेवणाला न देवून तिला कुपोषीत केल्याचे म्हटले आहे. यावरुन मुलीच्या मृत्यूस कारणीभूत तिचे आई व वडील जावेद शेख यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com