खूनानंतर संशयितांनी मयतांचे दोन्ही मोबाईल जंगलात फेकले

तिघा संशयितांना पाच दिवस कोठडी
खूनानंतर संशयितांनी मयतांचे दोन्ही मोबाईल जंगलात फेकले
मयत दाम्पत्य

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

कुसुंबा येथील पती, पत्नीच्या खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सुधाकर रामलाल पाटील (40, चिंचखेडा, ता.जामनेर), देविदास नामदेव पाटील (40) व अरुणाबाई गजानन वारंगणे (30) रा. कुसुंबा, ता. जळगाव या तिघांना मंगळवारी जिल्हा न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान खून केल्यानंतर संशयितांनी मयताचे दोन्ही मोबाईल जंगलात फेकून दिले होते. पोलीस कोठडीत संशयिताकडून ते मोबाईल हस्तगत केले जाणार आहेत.

कुसूंबा येथे दि. 21 एप्रिल रोजी रात्री सुधाकर रामलाल पाटील (40, चिंचखेडा, ता.जामनेर), देविदास नामदेव पाटील (40) व अरुणाबाई गजानन वारंगणे (30) रा. कुसुंबा, ता. जळगाव या तिघांनी मुरलीधर राजाराम पाटील व त्यांची पत्नी आशाबाई मुरलीधर पाटील या दांपत्याच्या खून केला आहे.

अरुणाबाई हिने आशाबाईकडून 12 लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्याशिवाय सुधाकर व देविदास हे देखील कर्जबाजारी होते.

त्यातून सुटका मिळण्यासाठी त्यांनी या खुनाचा कट रचला होता. त्यामुळे यात कट रचल्याचे वाढीव कलम लावण्यात आले आहे.

हा गुन्हा करताना संशयितांनी ज्या दोरीचे वापर केलेला आहे ती दोरी जप्त करणे बाकी आहे, त्याशिवाय दांपत्याचे दोन्ही मोबाईल चोरून जंगलात फेकला आहे.

मोबाईल जप्त करण्याचे असल्याचे सांगून एमआयडीसी पोलिसांनी तिघा संशयितांना 9 दिवस पोलीस कोठडीची मागणी केली. न्या.साठे यांनी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे अ‍ॅड गिरीश बारगजे यांनी काम पाहिले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com