गुरांच्या अवैध वाहतूकीदरम्यान वाहनातच दगावला बैल

एमआयडीसी पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल
गुरांच्या अवैध वाहतूकीदरम्यान वाहनातच दगावला बैल

जळगाव - Jalgaon :

तालुक्यातील उमाळा फाट्यावर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी काल सोमवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास कत्तलीसाठी अवैधपणे गुरांची वाहतूक करणारा आयशर ट्रक पकडला.

यात वाहनात कोंबलेल्या गुरांपैकी एका बैल दगावल्याचा झाल्याच्या प्रकारानंतर बजरंग बलाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून कठोर कारवाईची मागणी केली होती.

याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात ट्रकचालक सलमान खान अरमान खान वय २५ व अरबाज असमलम वय २३ दोन्ही रा. सावदा ता.रावेर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

उमाळ्या फाट्यावरुन एम.एच.२० ए.टी. ६२०६ या क्रमाकांचा गुरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक जात असल्याची गोपनीय माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली.

त्यानुसार कार्यकर्त्यांनी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास उमाळ्या फाट्यावर मिळालेल्या माहितीनुसार ट्रकला पकडले.

ट्रकमध्ये पाहणी केली असता, ६ बैल व ५ म्हशी कोंबलेले असल्याचे दिसून आले. त्यापैकी एका बैलाचा वाहनातच मृत्यू झाला होता.

यानंतर कार्यकर्त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकाराची माहिती देण्यात आली.

त्यानुसार सहाय्यक पोलीस निरिक्षक अमोल मोरे, पोलीस कॉन्स्टेबल हेमंत कळस्कर, पंकज सापकर, विजय नेरकर, असीम नजीर खॉ तडवी या कर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठले.

चौकशीत संबंधित गुरांची वाहतूक करणार्‍या ट्रकचालकाकडे गुरे वाहतुकीचा परवाना नसल्याचे आढळून आले. पोलिसांनी कारवाई करुन ट्र्रकचालक सलमान खान अरमान खान व त्याच्यासोबतचा अरबाज असलम या दोघांना ताब्यात घेतले.

तसेच वाहनात मिळून आलेल्या गुरांना कुसूंबा येथील बाफना गोशाळेत दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल असीम नजीर खॉ तडवी यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com