कुसूंबा येथील दाम्पत्यांचा खून व्याजाच्या पैशांवरुनच

गावातील महिलेसह तिघांना पोलिसांकडून अटक
कुसूंबा येथील दाम्पत्यांचा खून व्याजाच्या पैशांवरुनच

जळगाव - Jalgaon :

तालुक्यातील कुसूंबा येथील मुरलीधर राजाराम पाटील व आशाबाई मुरलीधर पाटील या पती पत्नीचा राहत्या घरात खून झाल्याची घटना २२ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता समोर आली होती.

एमआयडीसी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या संयुक्त कामगिरीत अवघ्या चार दिवसात या खूनाचा उलगडा झाला आहे.

या खूनाप्रकरणी पोलिसांनी अरुणाबाई गजानन वारंगणे वय ३० रा. कुसूंबा ता. जळगाव, देविदास नामदेव श्रीनाथ वय ४० रा. गुरूदत्त कॉलनी कुसूंबा ता. जळगाव व सुधाकर रामलाल पाटील उर्फ जिलेबी रा. वय ४५ रा. चिंचखेडा ता. जामनेर या तिघांना अटक करण्यात आली असून तिघांनी खूनाची कबूली दिली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली.

कुसूंबा येथे राहत्या घरात गळा आवळून मुरलीधर राजाराम पाटील व आशाबाई मुरलीधर पाटील यांचा खून करण्यात आला होता.

याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल आहे. यादरम्यान दाम्पत्यांच्या घरातील दागिणे तसेच रोकड असा पाच ते सात लाखांचा ऐवजही लांबविल्याचे समोर आले होते.

पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी व पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलिस ठाणे यांच्याकडून संयुक्तरितीन या खूनाचा तपास सुरु होता.

तांत्रिक मदत, घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुरावे या आधारावर तपास सुरु होता. कुसूंबा येथील अरुणाबाई वारंगणे हिने इतर दोघांच्या मदतीने कट रचून हा खून केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तिघांना वेगवेगळ्या पथकाने एकाचवेळी अटक केली.

ायत अरुणाबाई व देविदास या दोघांना कूसूंबा येथील राहत्या घरुन तर सुधाकर पाटील यास जामनेर तालुक्यातील चिंचखेडा येथून अटक करण्यात आली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com