व्याजाच्या पैशांतून खून झाल्याचा संशय

एमआयडीसी पोलिस ठाण्याचे तीन तर स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तपासासाठी रवाना
व्याजाच्या पैशांतून खून झाल्याचा संशय

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

तालुक्यातील कुसूंबा येथील ओमसाई नगरात दाम्पत्याचा गळा आवळून खून करीत त्यांच्याकडील सोने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली.

हे दाम्पत्य गावात पैसे व्याजाने देत असल्याने या व्याजाच्या पैशांतून त्यांचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

एमआयडीसी पोलिसांचे तीन तर स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तपासासाठी रवाना झाले असून वेगवेगळ्या बाजूंनी या गुन्ह्याचा तपास सुरु आहे.

जळगाव तालुक्यातील कुसूंबा येथील ओमसाई नगरात राहणारे मुरलीधर राजाराम पाटील व अशाबाई मुरलीधर पाटील या दाम्त्याचा गळा आवळून खून केल्याची घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.

मारेकर्‍यांनी पाटील दाम्पत्याचा खून करीत त्यांच्या घरातील कपाटात असलेले सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केल्याचे देखील उघडकीस आले आहे.

मारेकर्‍यांचा शोध घेण्यासाठी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी पोलिस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, अमोल मोरे व सोनवणे यांचे तीन व स्थानिक गुन्हे शोखचे एक पथक मारेकर्‍यांच्या मागावर असून त्यांच्याकडून सर्व बाजूंनी तपास केला जात आहे.

संशयितांची चौकशी आणि सुटका

खून झालेल्या पाटील दाम्पत्य हे गावात व्याजाने पैसे देत असल्याने त्यांची वेगळी ओळख होती. पोलिस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील यांच्या पथकाने त्या पुराव्यांच्या आधारावर सुमारे 9 जणांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली.

चौकशी केल्यानंतर त्या सर्व संशयितांना सोडून देण्यात आले. दरम्यान हा खून व्याजाच्या पैशांवरुनच झाला असल्याची चर्चा गावात असल्याने पोलिसांकडून त्या दृष्टीने तपाास देखील केला जात असल्याच समजते.

पोलिस संशयितांच्या मागावर

मुरलीधर पाटील हे शहरातील एका ब्रोकरकडे कामाला होते तसेच त्यांचा व्याजाचा देखील काम असल्याने त्यांनी गावात अलिशान घर बांधले होते.

दरम्यान मारेकर्‍यांनी त्या दाम्पत्याला एकाच ठिकाणी न मारता त्यांचा वेगवेगळया ठिकाणी खून केला असल्याने हे मारेकरी त्यांच्या ओळखीचे आसावेत असा देखील पोलिसांना संशय आहे. पोलिसांचे पथक त्या दृष्टीने देखील तपास करीत असून लवकरच मारेकरी पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com