जळगाव : महिलेवरील हल्लाप्रकरणी दांपत्याला अटक

जळगाव : महिलेवरील हल्लाप्रकरणी दांपत्याला अटक

जळगाव - बचत गटाच्या चेकवर सही करण्याच्या वाद विकोपाला जावून एका महिलेवर पहारने हल्ला केल्याप्रकरणी एका दांपत्याविरुद्ध हाणामारीचा गुन्हा दाखल झाला.

याप्रकरणी तालुका पोलिसांनी आरोपी दांपत्याला सोमवारी अटक केली.निमखेडी शिवारातील श्रीकृष्ण हौसिंग सोसायटीमधील उज्वला कैलास मिस्तरी (वय ३६) या रघुवीर समर्थ बचतगटाच्या सदस्या आहेत. त्या गुरुवारी दुपारी अंगणात भांडे घासत होत्या.

या वेळी त्या ठिकाणी माधुरी शत्रुघ्न सैंदाणे ही महिला तिचा पती शत्रुघ्न आत्माराम सैंदाणे याला सोबत घेवून गेली. आम्हाला बचत गट बंद करायचा आहे. असे सैदाणे दांपत्याने सांगितले. तसेच ८०० रुपये परत पाहिजे, म्हणून ते चेकवर स्वाक्षरी मागत होते. परंतु, बचतगट प्रमुख प्रतिभा पाटील आल्यावर त्यांच्या समक्ष सही देईल, असे उज्ज्वला मिस्तरी यांनी सांगितले. या कारणावरुन वाद निर्माण झाला.

शत्रुघ्न आत्माराम सैंदाणे याने लोखंडी पहारने उज्वला मिस्तरी यांच्या छातीवर आणि डोक्यावर वार केले. यात गंभीर जखमी झाल्याने मिस्तरी यांना बेशुद्ध अवस्थेत अतिदक्षता विभागात दाखल केले होते.

त्या शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांनी त्यांचे जबाब नोंदविले. त्यानुसार तालुका पोलीस ठाण्यात सैंदाणे दांपत्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तपास नाईक साहेबराव पाटिल तपास करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com