जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात गुरूवारी पुन्हा नव्याने 40 रुग्ण आढळुन आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 54 हजार 683 इतकी झाली आहे.

तर गुरूवारी दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यूची नोंद झालेली नसल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

गुरूवारी दिवसभरात आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील 16, जळगाव ग्रामीणमधील 00, भुसावळ येथील 13, अमळनेरातील 03 , चोपडा येथे 00, पाचोरा 00, भडगावातील 00, धरणगाव 00, यावल येथील 00, एरंडोल00, जामनेर 01, रावेर 01, पारोळा 00, चाळीसगाव 05 , मुक्ताईनगर00 , बोदवड येथील 01, परजिल्ह्यातील 00 असे एकूण 40 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 52 हजार 878 रुग्ण कोरोनामुक्त झाले. यातील 48 रुग्णांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला. सध्या 503 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.