ग.स.सोसायटीत कोरोनाचा शिरकाव

संचालकास कोरोनाची लागण
ग.स.सोसायटीत कोरोनाचा शिरकाव

जळगाव । प्रतिनिधी

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात जिल्हा परीषद इमारतीत येथे जि.प.अधिकारी व कर्मचार्‍यांचे स्वॅब घेऊन रॅपिड एँन्टिजन तपासणी करण्यात आली. कामानिमित्त जिल्हा परीषदेत येणार्‍यांची तपासणी करण्यात आली.

जि.प.कर्मचारी व अधिकारी यांच्यासह 102 जणांची तपासणी केली. यात ग.स.सोसायटीचे माजी अध्यक्ष तथा एका विद्यामान संचालकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

जिल्हा परीषदेचे कर्मचारी अत्यावश्यक सेवेत येत असल्याने कोरोना साथीच्या सुरुवातीपासुन कार्यालयात उपस्थित राहुन कामकाज करीत आहे. रोज शेकडो नागरिक कामानिमित्त जिल्हा परिषदमध्ये येत असल्याने त्यांच्या संपर्कातून जि.प.कर्मचार्‍यांना अनावधानाने कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे जि.प.सीईओ डॉ.बी.एन.पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप पोटोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिषेक ठाकुर, डॉ.संजय पाटील यांनी कर्मचार्‍यांचे स्वॅब घेऊन लॅब टेक्निशियन सदानंद खैरनार व औषध निर्माण अधिकारी शोभा खडके यांनी सॅम्पल तपासणी प्रक्रिया केली.

या शिबीरास जि.प. अध्यक्षा रंजना प्रल्हाद पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, आरोग्य सभापती रविंद्र सुर्यभान पाटील यांच्यासह जि.प.सदस्यांनी सहकार्य केले. या शिबीरास अतिरीक्त सीईओ विनोद गायकवाड, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.जयवंत मोरे, श्रीमती सुर्वे, राजपुत, अजय चौधरी, कांबळे आदिंनी विशेष सहकार्य केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com