जळगाव जिल्ह्यात आढळले 178 करोनाबाधित रुग्ण

जळगाव जिल्ह्यात आढळले 178 करोनाबाधित रुग्ण

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात शनिवारी पुन्हा नव्याने 178 रुग्ण आढळुन आले आहे. यामुळे

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 52 हजार 693 इतकी झाली आहे. तर शनिवारी दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शनिवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील 26, जळगाव ग्रामीणमधील 04 , भुसावळ येथील 11, अमळनेरातील 08 , चोपडा येथील 05, पाचोरा येथील 13, भडगावातील 01, धरणगाव 05, यावल येथील 05, एरंडोल येथील 05, जामनेरातील 40, रावेर येथील 14, पारोळा येथील 03, चाळीसगावमधील 07, मुक्ताईनगरातील 30, बोदवड येथील 00, परजिल्ह्यातील 01 रुग्णांचा समावेश आहे. .

जिल्ह्यात आतापर्यंत 50 हजार 072 रुग्ण कोरोनामुक्त झाले. यातील 256 रुग्णांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला.

सध्या 1191 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात शनिवारी दोन रुग्णाचा मृत्यू झाला. दोघी मृत्यू डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय येथे झाले आहेत.

मृत्यू झालेल्यांमध्ये रावेर तालुक्यातील 52 वर्षीय महिला, भुसावळ तालुक्यातील 45 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com