जिल्ह्यात आढळले 127 करोनाबाधित रुग्ण

जिल्ह्यात आढळले 127 करोनाबाधित रुग्ण

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात शुक्रवारी पुन्हा नव्याने 127 रुग्ण आढळुन आले आहे. यामुळे

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 52 हजार 215 इतकी झाली आहे. तर शुक्रवारी दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शुक्रवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील 29, जळगाव ग्रामीणमधील 01 , भुसावळ येथील 17, अमळनेरातील 05 , चोपडा येथील 14, पाचोरा येथील 00, भडगावातील 04, धरणगाव 00, यावल येथील 05, एरंडोल येथील 00, जामनेरातील 40, रावेर येथील 03, पारोळा येथील 03, चाळीसगावमधील 05, मुक्ताईनगरातील 00, बोदवड येथील 01, परजिल्ह्यातील 00 रुग्णांचा समावेश आहे. .

जिल्ह्यात आतापर्यंत 49 हजार 816 रुग्ण कोरोनामुक्त झाले. यातील 237 रुग्णांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला.

सध्या 1447 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात शुक्रवारी दोन रुग्णाचा मृत्यू झाला. दोघी मृत्यू शासकीय वैद्यकिय महाविद्यालात झाले आहेत.

मृत्यू झालेल्यांमध्ये रावेर तालुक्यातील 54 वर्षीय पुरुष तर पाचोरा तालुक्यातील 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com