जिल्ह्यात करोनाचा उद्रेक ; एकाच दिवसात आढळले ८७० रुग्ण
जळगाव

जिल्ह्यात करोनाचा उद्रेक ; एकाच दिवसात आढळले ८७० रुग्ण

१३ रुग्णांचा मृत्यू, एकाच दिवसातील आजपर्यंतची सर्वाधिक संख्या

Pankaj Pachpol

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

एकीकडे टेस्ट वाढविल्याने कोरोनाची साखळी तोडण्यात जिल्हा यशस्वी होत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असलातरी जिल्ह्यात शुक्रवारी एकाच दिवसात ८७० रुग्ण आढळुन आले आहे.

कोरोनाचा उद्रेक अद्यापही कायम असल्याचे चित्र आहे. शुक्रवारी आढळुन आलेल्या रुग्ण संख्येने जिल्ह्यातील आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. शुक्रवारी जिल्ह्यात १३ कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

शुक्रवारी आढळुन आलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील २२०, जळगाव ग्रामीण ७४, भुसावळ १०, अमळनेर ४४, चोपडा ९३, पाचोरा १४, भडगाव ४०, धरणगाव ७१, यावल २५, एरंडोल ५३, जामनेर ३७, रावेर ८६, पारोळा ३७, चाळीसगाव ६५, मुक्ताईनगर ०३, बोदवड ०५ येथील रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सद्यास्थितीत १४,५४३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, ५,८४१ रुग्णांवर उपचार सुरु आहे.

शुक्रवारी जिल्ह्यात एकूण १३ रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी तीन मृत्यू शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात, एक मृत्यू उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात, चार मृत्यू गोल्ड सिटी हॉस्पिटल, एक मृत्यू रुबी हॉस्पिटल, एक मृत्यू चिन्मय हॉस्पिटल, एकाचा मृत्यू चोपडा येथे तर दोन रुग्णांचा मृत्यू अरुश्री हॉस्पिटल येथे झाला आहे.

मृत्यू झालेल्यांमध्ये जळगाव शहरातील ६६ व ५५ वर्षिय पुरुष तर ५५ व ६४ वर्षिय महिला, अमळनेर तालुक्यातील ६३ वर्षिय पुरुष तर ५६ वर्षिय महिला, चोपडा तालुक्यातील ५० वर्षिय पुरुष, धरणगाव तालुक्यातील ९० वर्षिय महिला, पाचोरा तालुक्यातील ६५ वर्षिय पुरुष तर ७९ वर्षिय महिला, चाळीसगाव तालुक्यातील ६० वर्षिय पुरुष, जामनेर तालुक्यातील ८५ वर्षिय पुरुष, भडगाव तालुक्यातील ७२ वर्षिय पुरुषाचा समावेश आहे.शुक्रवारी जिल्ह्यात एकूण ५६६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com