जिल्ह्यात 540 नवीन रुग्ण ; 450 जण करोनामुक्त

जिल्ह्यात 540 नवीन रुग्ण ; 450 जण करोनामुक्त

एकूण रुग्ण संख्या 20 हजार 227

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह 540 रुग्ण आढळले.जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 20 हजार 227 झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

Last updated

पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील 72, जळगाव ग्रामीणमधील 9, भुसावळ येथील 39, अमळनेरातील 53, चोपडा येथील 18, पाचोरा येथील 80, भडगावातील 41, धरणगावमधील 10, यावल येथील 1, एरंडोल येथील 29, जामनेरातील 19, रावेर येथील 17, पारोळा येथील 59, चाळीगावातील 69, मुक्ताईनगरातील 16, बोदवड येथील 5, परजिल्ह्यातील 3 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 13 हजार 977 रुग्ण कोरोनामुक्त झाले. यातील 450 रुग्णांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला. सध्या 5 हजार 550 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण 700 रुग्णांचा मृत्यू झाला. यातील 12 रुग्णांचा मृत्यू नुकताच झाला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयात 4, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात 2, गोल्ड सिटी हॉस्पिटलमध्ये 3, रुबी हॉस्पिटलमध्ये 1, चाळीसगाव येथे 1, तर लोकसेवा हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला.

मृतांमध्ये जळगाव शहरातील 54, 62, 72 वर्षीय पुरुष, अमळनेर तालुक्यातील 56, 53 वर्षीय पुरुष, जळगाव तालुक्यामधील 68 व 70 वर्षीय पुरुष, धरणगाव तालुक्यामधील 40 व 75 वर्षीय महिला, पाचोरा तालुक्यामधील 40 वर्षीय पुरुष, चाळीसगाव तालुक्यातील 60 वर्षीय पुरुष आणि यावल तालुक्यामधील 53 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

Last updated

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com