जिल्हावासीयांना दिलासा; बाधितांपेक्षा बरे होणार्‍यांची संख्या अधिक

जिल्हावासीयांना दिलासा; बाधितांपेक्षा बरे होणार्‍यांची संख्या अधिक

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोना बाधितांच्या संख्येत मंगळवारी मोठी घट झाली असून, आढळुन आलेल्या बाधीतांच्या संख्येपेक्षा बरे होणार्‍यांची संख्या जास्त झाली आहे.

मंगळवारी पुन्हा नव्याने 261 रुग्ण आढळुन आले आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 47 हजार 907 इतकी झाली आहे. तर मंगहवारी दिवसभरात नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मंगळवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील 28, जळगाव ग्रामीणमधील 04, भुसावळ येथील 26 , अमळनेरातील 32 , चोपडा येथील 16, पाचोरा येथील 09, भडगावातील 07, धरणगाव 19, यावल येथील 04, एरंडोल येथील 03, जामनेरातील 21, रावेर येथील 29, पारोळा येथील 07, चाळीसगावमधील 39, मुक्ताईनगरातील 11, बोदवड येथील 04 परजिल्ह्यातील 02 रुग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 39 हजार 631 रुग्ण कोरोनामुक्त झाले. यातील 878 रुग्णांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला. सध्या 7 हजार 101 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण नऊ रुग्ण मंगळवारी दगावले.

यापैकी दोन मृत्यू शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, एक मृत्यू डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय, एक मृत्यू पाचोरा, दोन मृत्यू अमळनेर, एक मृत्यू गोल्डसटी हॉस्पिटल, एक मृत्यू सुविधा हॉस्पिटल, एक मृत्यू अकझोन हॉस्पिटल येथे झाला आहे.

मृत्यू झालेल्यांमध्ये जळगाव शहरातील 60,65,80 वर्षीय पुरुष, अमळनेर तालुक्यातील 74 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय महिला, चाळीसगाव तालुक्यातील 29 वर्षीय पुरुष, रावेर तालुक्यातील 72 वर्षीय महिला, यावल तालुक्यातील 82 वर्षीय पुरुष, पाचोरा तालुक्यातील 80 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com