करोना
करोना
जळगाव

जिल्ह्यात आणखी 605 बाधित रुग्णांची वाढ

एकूण रुग्ण संख्या 19 हजार 687

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह 605 रुग्ण आढळले. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 19 हजार 605 झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील 90, जळगाव ग्रामीणमधील 72, भुसावळ येथील 18, अमळनेरातील 12, चोपडा येथील 93, पाचोरा येथील 9, भडगावातील 61, धरणगावमधील 17, यावल येथील 10, एरंडोलमधील 82, जामनेरातील 17, रावेर येथील 30, पारोळ्यातील 7, चाळीसगाव येथील 67, मुक्ताईनरातील 1, बोदवड येथील 12 आणि परजिल्ह्यातील 7 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 13 हजार 527 रुग्ण बरे झाले. यातील 351 रुग्णांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला. सध्या 5 हजार 472 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण 688 रुग्ण दगावले. यातील 10 रुग्णांचा नुकताच मृत्यू झाला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयात 4, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात 3, रुबी हॉस्पिटलमध्ये 2 आणि चोपडा येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला.

मृतांमध्ये जळगाव शहरातील 56 वर्षीय पुरुष, जळगाव तालुक्यामधील 60 वर्षीय पुरुष, पाचोरा तालुक्यामधील 65 वर्षीय पुरुष, रावेर तालुक्यातील 48 वर्षीय पुरुष, चाळीसगाव तालुक्यामधील 62 वर्षीय पुरुष, मुक्ताईनगर तालुक्यामधील 69 वर्षीय पुरुष, धरणगाव तालुक्यामधील 80 वर्षीय पुरुष, भुसावळ तालुक्यातील 42 वर्षीय महिला, चोपडा तालुक्यातील 67 वर्षीय महिला, यावल तालुक्यामधील 62 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com