नव्याने 412 बाधित रुग्ण ; 541 रुग्ण करोनामुक्त
जळगाव

नव्याने 412 बाधित रुग्ण ; 541 रुग्ण करोनामुक्त

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव -Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात रविवारी पुन्हा नव्याने 412 रुग्ण आढळुन आले आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 47 हजार 154 इतकी झाली आहे. तर शनिवारी दिवसभरात सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

रविवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील 62, जळगाव ग्रामीणमधील 08, भुसावळ येथील 55, अमळनेरातील 34, चोपडा येथील 70, पाचोरा येथील 21, भडगावातील 04, धरणगाव 19, यावल येथील 28, एरंडोल येथील 29, जामनेरातील 17, रावेर येथील 09, पारोळा येथील 07, चाळीसगावमधील 32, मुक्ताईनगरातील 01, बोदवड येथील 07 परजिल्ह्यातील 09 रुग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 38 हजार 093 रुग्ण कोरोनामुक्त झाले. यातील 541 रुग्णांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला. सध्या 3 हजार 751 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण सात रुग्ण रविवारी दगावले.

यापैकी एक मृत्यू शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, चार मृत्यू डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय, एक मृत्यू पाचोरा, एक मृत्यू गणपती हॉस्पिटल जळगाव येथे झाला आहे.

यात भुसावळ तालुक्यातील 46 वर्षीय महिला, जळगाव तालुक्यातील 68 वर्षीय पुरुष, जामनेर तालुक्यातील 85 वर्षीय पुरुष, मुक्ताईनगर तालुक्यातील 58 वर्षीय महिला, यावल तालुक्यातील 64 वर्षीय महिला, पाचोरा तालुक्यातील 60 वर्षीय पुरुष, चाळीसगाव तालुक्यातील 71 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com