पुन्हा नव्याने 446 रुग्ण

एकूण रुग्णसंख्या 45 हजार 429
corona
corona

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात दिवसेंदिवस करोना बाधीतांची संख्या वाढत आहे. बुधवारी पुन्हा नव्याने 446 रुग्ण आढळुन आले आहे.

यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 45 हजार 429 इतकी झाली आहे. तर मंगळवारी दिवसभरात 04 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

बुधवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील 140, जळगाव ग्रामीणमधील 26, भुसावळ येथील 55, अमळनेरातील 11, चोपडा येथील 53, पाचोरा येथील 07, भडगावातील 14, धरणगाव 24, यावल येथील 05 एरंडोल येथील 05, जामनेरातील 22, रावेर येथील 11, पारोळा येथील 10, चाळीसगावमधील 28, मुक्ताईनगरातील 19, बोदवड येथील 07 परजिल्ह्यातील 09 रुग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 35 हजार 178 रुग्ण कोरोनामुक्त झाले. यातील 803 रुग्णांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला. सध्या 9 हजार 122 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण 04 रुग्ण बुधवारी दगावले.

त्यापैकी दोन मृत्यू शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, दोन मृत्यू डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय येथे झाले आहेत.

मृत्यू झालेल्यांमध्ये भुसावळ तालुक्यातील 74 वर्षीय पुरूष, चोपडा तालुक्यातील 23 वर्षीय पुरूष, पाचोरा तालुक्यातील 88 वर्षीय पुरूष, यावल तालुक्यातील 90 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com