611 करोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

corona
corona

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात दिवसेंदिवस करोना बाधीतांची संख्या वाढत आहे.मंगळवारी पुन्हा नव्याने 611 रुग्ण आढळुन आले आहे.

यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 44 हजार 983 इतकी झाली आहे. तर मंगळवारी दिवसभरात 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मंगळवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील 144, जळगाव ग्रामीणमधील 21, भुसावळ येथील 95, अमळनेरातील 27, चोपडा येथील 58, पाचोरा येथील 16, भडगावातील 15, धरणगाव 33, यावल येथील 18, एरंडोल येथील 22, जामनेरातील 33, रावेर येथील 06, पारोळा येथील 60, चाळीसगावमधील 23, मुक्ताईनगरातील 12, बोदवड येथील 11 परजिल्ह्यातील 07 रुग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 34 हजार 375 रुग्ण कोरोनामुक्त झाले. यातील 809 रुग्णांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला. सध्या 9 हजार 483 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण 11 रुग्ण मंगळवारी दगावले.

त्यापैकी तीन मृत्यू शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, चार मृत्यू डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय, तीन मृत्यू चोपडा, एक मृत्यू सुविधा हॉस्पिटल येथे झाले आहेत.

मृत्यू झालेल्यांमध्ये जळगाव शहरातील 52,65 वर्षीय पुरुष तर 42 वर्षीय महिला, भुसावळ तालुक्यातील 64, 73, 74 वर्षीय पुरुष, चोपडा तालुक्यातील 70,70 वर्षीय पुरुष, पाचोरा तालुक्यातील 83 वर्षीय पुरुष, यावल तालुक्यातील 80,80 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com