जिल्ह्यात करोनाचे चार नवे बाधित रुग्ण

जिल्ह्यात करोनाचे चार नवे बाधित रुग्ण

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात दिवसेंदिवस करोना बाधितांच्या संख्येत घट होत आहे. शनिवारी जिल्ह्यात कोरोनाचे चार नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे.

दिवसभरात 10 बाधित रुग्णांची करोनावर मात केली असून 13 तालुक्यात एकही करोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही.

जिल्ह्यात शनिवारी नवीन आढळून आलेल्या बाधितांमध्ये जळगाव शहर 2, चाळीसगाव 2 असे एकूण 4 रुग्ण आढळून आले आहेत.

तर जळगाव ग्रामीण, भुसावळ, अमळनेर, चोपडा, पाचोरा, भडगाव, धरणगाव, यावल, एरंडोल, जामनेर, रावेर, पारोळा, मुक्ताईनगर, बोदवड या 13 तालुक्यांमध्ये एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

जिल्ह्यात एकूण करोनाबाधिताची संख्या 1 लाख 42 हजार 601 एवढी झाली आहे. दुसरीकडे 10 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. 1 लाख 39 हजार 949 एवढ्या रुग्णांनी आजपर्यंत कोरोनावर मात केली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 575 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यात 77 अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com