जिल्ह्यात करोनाचे केवळ सहा रुग्ण

जिल्ह्यात करोनाचे केवळ सहा रुग्ण

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाची तीव्रता कमी होत असल्याने जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे.

बुधवारी केवळ सहा रुग्ण आढळले असून तब्बल 14 तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. दरम्यान, दिवसभरात 11 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 109 अ‍ॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

जिल्ह्यात नवीन आढळून आलेल्या बाधितांमध्ये जळगाव शहर 2, चाळीसगाव 4 असे एकूण 6 रुग्णांचा समावेश आहे.

तर जळगाव ग्रामीण, भुसावळ, अमळनेर, चोपडा, पाचोरा, भडगाव, धरणगाव, यावल, एरंडोल, जामनेर, रावेर, पारोळा, मुक्ताईनगर, बोदवड या 14 तालुक्यांमध्ये बुधवारी एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

जिल्ह्यात एकूण करोनाबाधिताची संख्या 1 लाख 42 हजार 540 एवढी झाली आहे. तर 1 लाख 39 हजार 856 एवढ्या रुग्णांनी आजपर्यंत करोनावर मात केली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकही मृत्यू झालेला नाही. आतापर्यंत 2 हजार 575 बाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच सद्यस्थितीला जिल्ह्यात 109 अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com