जिल्ह्यात करोनाचे 12 नवे बाधित रुग्ण

जिल्ह्यात करोनाचे 12 नवे बाधित रुग्ण
Corona

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात मंगळवारी करोनाचे 12 रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान दिवसभरात 10 बाधित रुग्णांची कोरोनावर मात केली असून 11 तालुक्यात एकही करोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही.

जिल्ह्यात मंगळवारी नवीन आढळून आलेल्या बाधितांमध्ये भुसावळ 2, अमळनेर 1, चोपडा 2, भडगाव 1, चाळीसगाव 6 असे एकूण 12 रुग्ण आढळून आले आहेत.

तर जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, पाचोरा, धरणगाव, यावल, एरंडोल, जामनेर, रावेर, पारोळा, मुक्ताईनगर, बोदवड या 11 तालुक्यांमध्ये मंगळवारी एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

जिल्ह्यात एकूण करोनाबाधिताची संख्या 1 लाख 42 हजार 534 एवढी झाली आहे. दुसरीकडे 10 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

1 लाख 39 हजार 845 एवढ्या रुग्णांनी आजपर्यंत कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 575 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यात 114 अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com