जिल्ह्यात करोनाचे केवळ सहा रुग्ण

जिल्ह्यात करोनाचे केवळ सहा रुग्ण

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात सोमवारी करोनाचे सहा रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान 7 बाधित रुग्णांची कोरोनावर मात केली असून 12 तालुक्यात एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही.

जिल्ह्यात रविवारी नवीन आढळून आलेल्या बाधितांमध्ये चोपडा 1, पाचोरा 1, चाळीसगाव 3, पारोळा 1 असे एकूण 6 रुग्ण आढळून आले आहेत.

तर जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, भुसावळ, अमळनेर, भडगाव, धरणगाव, यावल, एरंडोल, रावेर, जामनेर, मुक्ताईनगर, बोदवड या 12 तालुक्यांमध्ये सोमवारी एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

जिल्ह्यात एकूण करोनाबाधिताची संख्या 1 लाख 42 हजार 522 एवढी झाली आहे. दुसरीकडे 7 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

1 लाख 39 हजार 835 एवढ्या रुग्णांनी आजपर्यंत करोनावर मात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 575 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यात 112 अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com