जिल्ह्यात करोनाचे नवे 11 रुग्ण

जळगाव शहरात सर्वाधिक 8 रुग्णांचा समावेश
जिल्ह्यात करोनाचे नवे 11 रुग्ण

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात शनिवारी करोनाचे 11 रुग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधिक जळगाव शहरात 8 रुग्ण आढळून आल्याने शहरवासियांसाठी चिंताजनक बाब आहे.

दरम्यान 19 बाधित रुग्णांची करोनावर मात केली असून 12 तालुक्यात एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही.

जिल्ह्यात शनिवारी नवीन आढळून आलेल्या बाधितांमध्ये जळगाव शहर 8, जळगाव ग्रामीण 1, भुसावळ 1, धरणगाव 1, असे एकूण 11 रुग्ण आढळून आले आहेत.

तर अमळनेर, चोपडा, पाचोरा, भडगाव, यावल, एरंडोल, जामनेर, रावेर, पारोळा, चाळीसगाव, मुक्ताईनगर, बोदवड या 10 तालुक्यांमध्ये शुक्रवारी एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

जिल्ह्यात एकूण करोनाबाधिताची संख्या 1 लाख 42 हजार 511 एवढी झाली आहे. दुसरीकडे 19 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. 1 लाख 39 हजार 815 एवढ्या रुग्णांनी आजपर्यंत करोनावर मात केली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 575 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यात 121 ऍक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com